पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठे सरदार, मुत्सद्दी वगैरे. १ नागपूरकर भोंसले. श्री. श्रीमत् परमहंसबावा स्वामी यांहीं - निजभक्तशिरोमणी सहस्रायु चिरंजीव रघोजी भोंसले यांसी आज्ञा केली ऐसीजे:— श्रीनें कांहीं तुमचें कार्य केलें नाहीं व बरें कांहीं केलें नाहीं. पूर्वी बापूजी भोंसले हबशी यापासून सोडविलें व संताजी भोंसले यांची बेडी नानाकरवीं प्रयत्नें तोडविली. बयाबाई यांणीं पांडवगडीं होती तेव्हां त्यांणीं श्रीची सेवा केली, तेव्हां आझी संतोषी जाहलों. ते समयीं त्यांणीं सांगितले जे, माझा रघुजी यास आशीर्वाद भाग्यास आला ह्मणजे स्वामींचे सेवेसी चुकणार नाहीं; तर रघोजीस आशीर्वाद उत्तमप्रकारें धावा. ते समयीं तुह्मांवर पूर्ण दया जाइली. त्यापासून तुमचें कल्याण इच्छितों. त्यासी श्रीनें तुह्मांस संतत, संपत्ति, यश दिल्हें. तुझी तो सेवेसी चुकणार नाहीं, परंतु आह्नींच त्या प्रां- तास येत नाहीं. आलियावर तुझांपासून अंतर पडणार नाहीं. तुमचे गांवीं जेवरी माळशिरसचीं कुळें पळोन आलीं, त्यास मानाजी खलद- कर याकडेस श्रीचें कर्ज येणें रुपये वगैरा कुल त्याकडेस येणें आहे. त्यासी तुमचे गांवीं कुळें आलीं, तो गांव श्रीचाच आहे. तर तेथें कुळे आहेत त्यांकडेस रुपये येणें. त्यासी दोन चार कुळें आह्मीं आ णून अटकेंत ठेविलीं. त्यांचीं माणसें तुमचे स्थळीं आहेत. तर तीं कुळें आपले हातीं घेऊन त्यांकडील मुद्दलच रुपये तुझीं देवणें. तुझीं कुळां- बद्दल हवाला घेतला आणि रुपये पाठविले ह्मणजे कुळें पाठवून देऊं. येणेंप्रमाणें नांवनिशी:- [लेखांक २९५] २७७ -