पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ भाग्याशी, ऐसेंच घडले. सहस्रायु चिरंजीव सदाशिवपंत भाऊ यांसी आज्ञा ऐसीजे:-पांच हजार रुपयांची पावती पाठविली ते आपण फि रोन पाठविलें; आणि खंडोजीबरोबर सांगोन पाठविले कीं, मुद्दल पैकीं पांच हजार पावले ऐसी पावती द्यावी. तरी आजिपर्यंत व्याजाचा हि- शेत्र काय होतो तो तुझीं फडनिसाजवळ पुसावें. पांच हजार जाजती होतील. पुढे व्याजाचा हिशेब द्याल, त्यामध्यें पांच हजार वजा करावें. पावती काल पाठविली तेच पावली असे. विल्हेस लावून ठेवावी. वर- कड, हेमगर्भाविस लिहिलें होतें. त्यास आपण लिहिलें कीं, यत्न केला परंतु मिळाला नाहीं. तरी आह्मीं वैद्याकडून हेमगर्भ दोन तोळे आण- विला आहे. रुपये वीस पडले, तरी वीस रुपये किंमत पाठवून दिली पाहिजे. वरकड तुझी मजशीं दोन भाव धरितां, हे गोष्ट कामाची नाहीं. माझे शरीरीं किमपि ताकद राहिली नाहीं. हाडें निघालीं तीं तुझीं आ पले डोळ्यांनी पाहिलीं. ऐशास मजला तवाना करणें असेल, तरी एक लैस दुभती, चांगली, ऐसी खिल्लारांतून आणवून पाठवणे. वरकड, आह्मी तुझांसीं काडीभर प्रपंच धरीत नाहीं. आजपावेतों तुझांकडे मागेंपासून उसनवटें बहुत होतीं. त्यांचा हिशेब ह्मणावा तरी बहुतच होईल. व र्ताळा अलीकडे जाइला, परंतु माझें धैर्य थोर आहे. काल तुझी दर्श- नास आलेत तेव्हां एक शालजोडी तरी लांबसी आणावी होती ! वृद्धाप काळी स्नानसंध्या करितों. मागें लग्नाची पाठविली तेही आह्मांयोग्य पाठविली नाहीं. ऐसे दोन भाव धरूं नका. वरकड तुझी येथून गेलेंत तेव्हां वाटेस याद जगन्नाथ चिमणाजी यांहीं नेऊन तुझांस दाखवून xxx पाठविली आहे. तेणेंप्रमाणें नारो राम मजमदार तारापूर याची सनद करून पाठविली पाहिजे. पंचवीस रुपये जाजती एकूण सव्वादो- नशे रुपये सनद पाठवावी. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा हे आज्ञा.