पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७५ हिणार नाहीं. तुझांस संसाराची चिंता आहे. पालखीची चिंता याज- विशेष असावी. आतां वारंवार लिहीत नाहीं. चिरंजीव नानाचें वर्तमान काय ? कोणते गडकोट हबशांचे जंजिरे घेतले हैं न कळे. त्या- जकडीलही पत्र फार दिवस येत नाहीं. चिरंजीव दादोबास आशा केली ऐसीजे, चिरंजीव सदाशिव- पंत यांसी पत्र पाठविले आहे. तर त्याजकडे प्रविष्ट करून उत्तर पाठवणे. जाणीजे. [ लेखांक २९३ ] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव सदोबा यांसी आज्ञा. तुमचे मस्तकीं हात ठेविला. आपले स्वरूप तुझे स्वरूपांत घातलें. जसा पांडवास श्रीनें अनुग्रह केला. विश्वासो फळ होय. कां तुझीं सा वर्षांचा मक्ता पैक्याचा करून दिल्हा ! नियताप्रमाणे समाधीस द्यावें. त्यावेगळी टोपीस मखमल मागितली तर एवढा माझा अन्याय पोर्टी घालणे !! प्रसादिक समाधीची शालजोडी सात हात पाठविली आहे. या शा लेवर स्नानसंध्या करणें. चिरंजीव नानानें आज्ञा करून पत्रे दिली होतीं. बरवाजी पाटील व शंकाजी केशव व खंडोजी माणकर यांसी पत्रे दिलीं जे, त्या प्रांतींचे हशम, मुलूख उत्तम, भिक्षा करून देणे. याकरितां तिकडे माणसें पाटविलीं आहेत. तर दुसरीं ताकीदपत्रे त्यांस पाठवून भिक्षा जमा होय तें करणें. कैलास- वासी बाळाजी नानापासून पिलाजी जाधव याणें बहुत द्रव्य मि- ळविले आहे. दोन तीन कोटी द्रव्य आहे. तर फुरसतीनें श्रीचा अंश असिला तर द्रव्य युक्तिप्रयुक्तीनें घेऊन हशमांस वांटणी करणे. [ लेखांक २९४ ] भार्गवराम. . श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं अनंत जन्मांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी, मर्यादा नाहीं