पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ तुमची निष्ठा या प्रकारची ! तुझांस कामास येईल !! इतक्यावर आह्नीं काय करावें ? वसईचें ठावें आहेना ? वसई न आली तर या राज्यांत राहील त्याचें संन्यासपण लटकें असे कागद गेले होते! ते तुझांस ठा- वेंच आहेत. पंधरा दिवस गोमूत्र टाकिलें होतें. ऐसें असोन तुह्मांस होणारासारखी बुद्धि आठविली ! सासवडचें ठावके आहेना ? पुण्यांत मन कां कष्टी केलें होतें ? [ लेखांक २९२ ] श्री. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं - श्रीभगवान्स्वरूप परमेश्वराचें तेज सदोबास आज्ञा केली ऐसीजे:- बहुत दिवस जाइले, परंतु समाचार कळत नाहीं. बरें आमचें काय जातें ? तुमचे पूर्वज जें जाहलें वर्तमान सविस्तर लिहीत असत. संक्र- मणाचे तीळगुळ पाठवीत असत. बापुजी मेघश्याम याजकडे उद कदत्त रुपये ५० पन्नास येणें व रामचद्रपंत पिंपळनेरकर दिमत कवडे याजकडे उदकदत्त रुपये ५० व वस्त्रें २ ऐसीं येणें आहेत; तर बा पुजीपंताकडील व रामचंद्रपंताकडील रुपये १०० व वस्त्रे २ ऐसीं पाठवून देणें. रुपये पोताचे पाठवून तुझीं त्याजकडून जासूद पाठवून रुपये आणवणें. या गोष्टीनें तुमचे पदरीं पुण्यच पडेल. तुमचे वडि- लांनीं न्हावीचे तळावर एका घटकेत हजार रुपये भिक्षा परहस्तें करून दिली. तुझी ऐसें करितां, हें बरें कीं काय ? कार्य होतें व आमचें चित्त संतोषी होतें ऐसें करणें. राजा झणजे कोणास नेदी. आमचें उदकदत्त येणे रायाकडे रुपये पांचरों होते. ते त्यांसी कळतांच रुपये पोताचे पाठविले आणि त्याजकडून घेतले. तुझी तो पुरातन श्रीचे आणि असें करितां हें काय ? पुढिले जन्मीं येईल कीं काय ? पालखीकरितां कितेक वेळां लिहावें १ अतःपर लि- तुमचें देवाचें १ लेखांक ८१ पहा.