पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७३ सदाशिव चिमणाजी श्री. [ लेखांक २९१]* श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं चिरंजीव सदाशिव चिमणाजी यांस आज्ञा केली ऐसीजे:-आझीं निशाण पाठविलें जे, नानाची फत्ते होवो आणि किलीजखान यास पा- दाक्रांत होऊन याचे पायाखालीं येवो, ह्मणून आह्मी, तीन महारुद्र भुलो- बास बोलिलों. त्यासी दोन महारुद्र आह्मी करीतच आहों. एक महारु द्राची सामग्री राधाबाई काय लागेल ती पुण्याहून माळशिरसास पाठवील तरी पाठवणें. न पाठवील तर आमचा पायपोस गेला! तीन महारुद्र करून आह्मीच श्रेय घेऊं. नाहींतरी तुझांस देऊं. कैलासवासी नानापा- सन उभे चतुर्थीचें श्रेय समाधीचें श्रेय तुमच्याच कार्याकरितां देतों, हें राधाबाईस कसें न कळे ? आणि ती डोळ्यावर कसें कातडे घेत्ये १ तिचे लेकानें पुण्याचे मुक्काम काय काय देऊं केलें होतें तें अवधें xxx गेलें ! जावो !! मज कोप आणूं नका. कोप आणल्यास कोणाचें बरें झालें नाहीं. नानाची काय गत व महादाजी बल्लाळ याची काय गत व विरूबाईची गत काय झाली हैं तुझांस कसें न कळे! आठ दिवस पैका पाठवून देतों ह्मणून नेम केला त्यास दिवस किती जाहले ? इल्लीं तळ्याचे कामास कर्ज पैकीं रुपये १०,००० दहा हजार पाठवून देणें. न पाठविल्यास जसा पुण्यांत आपावर कोप होऊन गेलों, तैसा कपा- ळास काठी घेऊन उनातानांत एखादेकडेस जाईन. पुढे काय होईल तें कळों येईल. पुण्यावर कोप होऊन तळेगांवास गेलों. तेथें उमाबाईनें वस्त्रपात्र देऊन पूजा केली. दमाजीकडे जाऊं न देई. आणि काल सा- तान्याहून भेटीस धावडशीस येऊन दोन हजार रुपये आणून दिले. ऐसी त्या लोकांची निष्ठा आणि तुह्मी तों आमचीं ह्मणवितां, आणि लेखांक ८३ हें लेखांक २९१ चें उत्तर असावें. १८