पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ • आह्मीं आल्यावर घोडाच स्वामीयोग्य देऊं. त्यास आझीं तो येथें बा- रारों रुपयांचा घोडा तुरकी घेतला आहे. पाहे. राजानें घोडा दिल्हा आहे तो कसा, चौमुलकांत कीर्त जे, असा घोडा खासा बावांस दिल्हा. आणि तुझी घोडें देतां ते निबर, आमचे कामाचें नाहीं, ऐसें कृत्रिमें देतां. याजकरितां आह्नीं लिहिलें कीं, रुपये पाठवणें आलीं आपले खातरेयोग्य घोडा घेऊं. त्यास तुझांस मजपेक्षां रुपयेच अधिक जाले कीं काय ? हल्लीं आह्नीं घोडा तो घेतलाच आहे. तुमचे चित्तास येईल तरी बाराशें रुपये पाठवून देणें. वरकड वर्ताव्याचे रुपये राहिले आहेत. ते आह्मांस निकड रुपयांची आहे. तरी राहिले रुपये सोमाजीबरोबर पाठवणें व एक तोळाभर कस्तुरी व दोन तोळे केशर व तोळाभर अंबर ऐसें पाठवणें. तुमचे पुण्यानें गणपतीचे देवळाचें व तळ्याचें काम आजि वर्ष दीडवर्ष लागले आहे. चार साडेचारशें माणूस खपतें हेंही तुमच्या पुण्ये सिद्धीस जाईल. आह्मी राजुरास निघोन जाणार होतों परंतु राजेयानीं राहविलें नाहींतर आमचें नांव कशास घेतां ? जर तुमच्याच पुण्यानें चालत असिलें तरी तेंही आझी पुढे पाहतच आहों. आह्मांपेक्षां तुझांस रुपये अधिक जाले असिले, तरी रुपयेही न देणें आणि घोडेंही न देणें. मग आमचे कपाळीं असेल तें होईल. आझी तुमचे पुण्यानें समाधींतून सुखरूप उठलों तरी भेट होईल. नाहीं तरी संस्थान चालविणें है तुमच्या वडिलांपासून तीन पिढ्या क्रियाभाक झालीच आहे. तें स्मरोन चालवालच यांत अपूर्व काय आहे? आमची खर्चाची वोढ बहुत आहे. वार्षिकप्रमाणे सा हजार एकरों रुपये चतुर्थी अलीकडे चार दिवस सोमाजी बरोबर पाठविलेंत ह्मणजे संतोषी होईन. आणि वार्षिकप्रमाणे पशमी थानें ४ व शालजोडी एवढीं पाठवून देणें. व घोडीचे रुपये बाराशें ऐसे पाठविले पाहिजेत.