पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७१ कर्तेपण कळों येईल, विशेष काय लिहिणें ? उत्तर आलियावर यास तुझांकडे पाठवून देऊं. * [ लेखांक २९० ] श्रीभार्गवराम. मननिर्मल गंगाजल पेशवे प्रधान बरें, तुर्की आठवीत नाहीं. परंतु आझी बाळाजी पासून तुमच्या गाई चारितों बरें, तुमच्या मनांत आलें तरी बरें, तुझांस ठाऊक नाहीं तर आह्मी सांगतों. तुझी आलेत तेव्हां साडे पांचरों रुपयांची वस्त्रे लागलीं. काल सदाशिवबाबा आले तेव्हां वस्त्रे ऐशी रुपयांचीं लागलीं. तुझांस सारें ठाऊक आहेच. परंतु आह्मी उगेंच लिहितों. आह्मी कांहीं तुझांजवळ मागत नाहीं. तुझीं सा- हजार एकरों वर्षास देतां, तेवढेच आझांस कोटीचे जाग आहेत. आह्मी समाधीस बसलों; परंतु एक पशमी थान व दोन चार शालजोडी लांबसी साडे सात हात ऐसी सोमाजी बरोबर पाठवून देणें तिजवर स्नानसंध्या करून तुमचे पदरीं पुण्य पडेल. तुझांस मघ प्रसाद ८ ॥ आदमण पाठविला आहे. हे आज्ञा. आलीं घोड्यासाठीं तुझांस लिहिलें होतें. घोडा देणें, नाहीं तर हजार रुपये देणें. त्यास तुझ लिहिलें कीं

हा मजकूर बाळाजी बाजीराव ह्यांच्या एका पत्रावर लिहिला आहे. ते पत्र येणेप्रमाणे आहे:- श्री - “श्रीमत् महाराज श्रीपरमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल आश्विन शुद्ध चतुर्थी रविवारपर्यंत स्वामींचे आशीर्वादेकरून यथास्थित असे विशेष. उत्तर प्रांतींचा कार्यभाग उरकून त्रितिया मंदवारीं स्वामींचे आशीर्वादप्र- तापेंकरून सुखरूप पुण्यास आलों. स्वामींस अवगत व्हावे ह्याकरितां लिहिलें असे. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना. " .. - . हे पत्र आश्विन शुद्ध ४ ह्मणजे ता० ५ जुलई इ० स० १७४१ ह्या मितीचें आहे. त्यावरून वरील स्वामींचें पत्र इ० स० १७४१ सालचें असावें असें दिसतें. १ लेखांक ७६-८४ पहा. ह्यांच्या पूर्वीचें हे पत्र दिसतें.