पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ हे शब्द किती उर्मटपणाचे आहेत हे चतुर वाचकांस सांगावयास नकोच. ह्याच शब्दांवरून त्याचें व स्वामींचें बिलकुल रहस्य राहिले नसावें है अगदी स्पष्ट दिसून येतें. परशुरामाहून स्वामींची कारकूनमंडळी निघून गेल्यानंतर पेढें येथें राहि- लेल्या स्वामींच्या लोकांस सिद्दी सात ह्यानें नानाप्रकाराने त्रास देण्यास सुरु वात केली. सिद्दी सात हा याकूदखानाचा ताबेदार असल्यामुळे व त्याचें व स्वामींचें चांगलें रहस्य असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कांहीं करितां येईना. ह्मणून त्यानें पेढें येथें हुसेन नांवाचा एक मुलाणा उभा करून त्याजकडून स्वामींचा विश्वासू ब्राह्मण बापू जोशी ह्यास घसघस लाविली. हा स्वामींच्या आश्र- यानें पेढें येथें शेतें भातें करीत असे. त्याच्या शेतावर मुलाण्याकडून हक सांगून त्यास अंजनवेली सुभ्यास पकडून नेलें व त्यास दहा रुपये दंड करून त्याजकडून एक बळजबरीनें कतबा लिहून घेतला. तो येणेंप्रमाणेः- हु " “ अज सुभा मामले दाभोळ व प्रांत राजापूर दमहम बापू जोशी सा- कीन मौजे पेढें तर्फ चिपळूण सु॥ समान अशरीन मीया व अलफ कारण साहेबाचे बंदगीस लिहून दिला कतबा ऐसाजेः- मुलना हुसेन पेटेंकर यांची शेतें मशिदीचीं पेढें यांत असत. त्यापैकी एक दोन शेतें कमीनाखालीं कुण- बावेयास कमाविसीस आहेत. त्यास हल्हीं मुलना हुसेन सुभा येऊन जाहिर केलें कीं, मशिदीचीं शेतें जोरावारीनें बापू जोशी खातो. यापासीं आपण शेते सोडून देणें ह्मणून बोलत होतो. परंतु शेते न सोडी. ऐसें जाहीर केले. त्या- बद्दल कमीनास मुभा आणून हकीकत पुशिली तरी आपण कांहीं पेढें याचा - १. मुलना हुसेन पेढेंकर हा मुसलमान इसम परशुराम येथील हिंदुलोकांस स्वामी वरघा आल्यानंतरही वारंवार उपद्रव देत असे. स्वामींनी ह्याबद्दल पुनः सिद्दी सात यांजकडे तक्रार नेली होती असे लेखांक २४९ वरून दिसून येतें. सिद्दी सात द्यानें, तो “खपती, दिवाणा, बेशौर" झणजे अगदीं वेडा आहे अशा अर्थाचे उद्गार काढून, स्वामींचे समाधान केले आहे. परंतु हा सर्व लाघवी प्रकार असावा असे वाटतें. ,