पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० तूं पूर्णआयुष्यी होशील. मजला भार्गवाजवळ व भुलोबाजवळ मागणें हेंच. आह्मांस एवढें मानपत्र पावलें. इतके दिवस मार्ग पाहतों. पत्रे पाठविलीं ह्मणून लिहिलें तर आह्मांस पावलीं नाहींत. तुमचीं फत्तेचीं पत्रे वरचेवर पाठवीत जाणें. ह्मणजे संतोषी होऊं. तीळगूळ संक्रमणाचे पाठविले आहेत. स्वीकारणें हे आज्ञा. तुमच्या पुण्यानें नवीं कामें येणेंप्रमाणे लाविलीं. पाणी लागलें:- १ पिंगोरी, १ शिरवळानजीक आंधारे १ कासुरणीस, १ तळें भुलेश्वर एकूण चार कामें नवीं केलीं. पाणी लागलें. कळावें ह्मणून लिहिले आहे. आणखी एखादें मोठेंसें संकट घालणें. जेथें पाणी नसेल तेथें पाणी करून श्री देईल. महादोबा श्रीचा आहे. स्वामींच्या कामावर एकनिष्ठ आहे. याजवर दया करीत जाणें. - [ लेखांक २८९ ] श्री. ● नानांस आज्ञा. दत्ताजी कनोजे ह्मणून सरदार नामांकित कान्होजी आंगरे सरखेल यांजवळ होते. ज्यांणीं जयगड बांधला, मोठमोठ कामें केर्ली, ते मृत्यु पावले. त्यांचे पुत्र सयाजी कनोजे, आझांजवळ सखोजी आंगरे यांचे वेळेस आले. त्यास अन्न महिपतगडचा हवाला श्रीनिवासराऊ यांजकडून महिपतगडर्डी यमाजी शिवदेव यांजकरवीं सांगविला होता. बरेंच चालत होतें. त्यास यंदा बजाजी कदम याणें रसद पांचरों रुपये यमाजीपंतास देऊन हवाला दूर करविला. आ णखी अन्न दुसरे जागा सांगूं ह्मणून गळां पडिला आहे. परंतु सयाजी कनोजे राहत नाहीं ह्मणतो. याचें आझांस अगत्य आहे. कर्ता आहे. त्यास उत्तम एका किल्ल्याचा हवाला सांगावा. तेथें चौकस धंदा क रील. कामाचा असला तरच याचें चालवावें. तुझांसही याचे सहवासें १ सयाजी कनोजेः-लेखांक ७२|७६ | १५५ पहा.