पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६९ पाठविले पाहिजे. घोडी पाठविली ती आप धुरंधर चिरंजीव बाजीराऊ व तात्या गुरुवारीं दशमीस धावडशीस भेटीस आले होते. तुह्मांस कळावें याजकरितां लिहिले आहे. तुझांस प्रसाद भोगवस्त्र दुलई ठेविली होती, ते भेटीचे समयीं अंबाजीपंत तात्यांहीं भांडोन झगडोन आह्मांपासून घेतली. ऐ शास दुलई पांघरावयास पाहिजे तरी, या दोघांस न कळतां दुलई चित्तास येईल तैशी करून सोंवळ्याची पाठविणें. बाजीराऊ व तात्या दोघे भांडतात. त्यांचें तुजकरितां आझी चालवितों. तुजही कळलेच आहे. आझीं लिहिले होतें जें, राजा येईल तेव्हां तूं सा- तारा येणें. त्यास बापू, तूं आमचें कोठें ऐकतो? येथें तो अवघे पांच सा पातकी आहेत. उमाबाईकडे अवघे जाले आहेत. सदाशिव सुखी असावा. चिरंजीव रामास जाऊं. लौकर ल्यास पावती केली. [ लेखांक २८८ ] बाळाजी बाजीराव. श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव विजयीभव नाना प्रधान यांसी आज्ञा ऐसीजे:- तूं वंश बाळाजीचे पोटास आलास. यासी कोणी लटकें ह्मणेल तोच अधःपातास जाईल. याकरितां तुझीं उदासपणें लिहिलें तर मी तपश्चर्या तुझांकरितां करितों. याहून तपश्चर्या सुईचे अग्र करून संकष्टा चतुर्थी समाधि आपले ऐस घेईन. तुझीं निर्भय चित्तें मुलुखगिरीस जाणें. को- टीची फत्ते होत आहे. श्रीचरणीं भाव ठेविला ते पूर्णआयुष्यी झाले. ● . १ तात्या: – अंबाजी त्रिंबक पुरंदरे. - ....... २ बापूः - चिमाजी आपास स्वामींनी प्रेमळपणानें चिमणाबापू ह्या अर्थी बापू हें संबोधन दिले आहे.