पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ व जाइले उत्तम इरसाली पाठवून देणें. बरें, वसईचा अभिमान श्रीस आहे. तुझी चिंता करितां एक गुण, श्रीस दशगुण आहे. चिरंजीव बाजीराऊ याकडील वर्तमान लिद्दोन पाठविलें तें पावलें. विशेष काय लिहिणें ? हे आज्ञा. [ लेखांक २८६] श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव आपांस आज्ञा. तुझांस बहुमान झाला, आह्मांस स्वर्गातून विमान आलें. यास लटकें असेल तरी आह्मांस शिष्याची आण असे. हेच प्रमाण असेल तरी अंतकाळ बराच येईल. बहुमानाची भिक्षा देणें. शेणवी याणें आमचा अपमान केला आहे. त्यापासून पंच- वीस हजार रुपये घेणें. आझांस नानाप्रमाणे ह्मणत असत तर चौवीस हजार खर्च करून एक हजार आह्मांस पाठवून देणें. निळो पतकी चि- पळूणकर याणे हबशी याकडे आमच्या चाड्या सांगोन परशरामींतून आमचे भांडीं, दरवाजा, नगारे नेविले आहेत. त्याच्या लेकाचा धंदा नारायणगडी आहे. त्यास दूर करून कचेश्वर गोविंद (यास नेमणें ). माझा अपमान शेणवी याणें केला आहे, तो कैलासवासी नानाचा अप- मान केला आहे. त्याचें पारपत्य केलेंच पाहिजे. [न] कराल तर परशरा- माची आण असे. [ लेखांक २८७] श्री. मननिर्मल गंगाजल चिरंजीव चिमाजी आपा यांसी आज्ञा केली ऐसीजे:- चिरंजीव सदाशिव याचें कांहीं वर्तमान लिहीत नाहीं. तुझीं आंबे बनसोडीचे पांच पाठविले; आणखी पाठवावयास नव्हते कीं काय नकळे ! कोठून पाठवाल ? विजवडीबद्दल बनसोडीचे आंबेयांच्या आटोळ्या असतील त्या व आणखी इरसाली आंबे नारायणगांवच्या आटोळ्या असतील त्या पांचरों पावेतों ज्या पाठवाल त्या कार्याच्या आहेत. आझी आहों तों पाठविल्या तर लावून मग समाधीस परश- -