पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६७ तुमचे पुत्रासन्निघच आहें. द्वारकेस गेलों असें लोकांस वाटतें. परंतु क्षणभर विस्मरण पांडवांचें पडेल तेव्हांच अवतार संपूर्ण जाहला. ऐसें शपथपूर्वक बोलिला. कुंती व कितेक भक्त कृष्णास ह्मणाले जे, तुझे निजभक्त पांडव आणि वनवासास कां जातात? तेव्हां उत्तर दिलें जे, यांसी वनवासास पाठवून तपश्चर्या करितील. मग ते तपोबळें कौ- खांचें निर्दालन करितील, तर तुझीं रुपयांचें लिहिले तर पांच हजार काय व शंभर काय व लक्ष काय व रुपया काय ! मी तुमचा जागली बोलिजे. पूर्वी भक्तितपःसामर्थ्यं वामन द्वारपाळ केला, त्याप्रमाणें तुझी भक्तियोगेंकरून आह्मांस कालकम परशराम यांसी आपले द्वारपाळ करून ठेविलें तर सोडावयाची आज्ञा कधीं द्याल ती कळत नाहीं. काडीमुड्याचीं वाईटश कामें होत आहेत हें श्रेय तुमचेच पदरीं पडतें, मातुश्रीचे शरीरीं सावकाश नाहीं ह्मणून लिहिलें, तर आरोग्यता जा इलियाचें वर्तमान लिहिलें नाहीं तर आह्मांस तेथवर यावें लागेल. गतंवर्षी आमचे शरीरीं वेथा जाहली ते समयीं मातुश्री धावडशीस आली होती. आरोग्य जाहलियाचें वर्तमान लिहोन पाठवणे. पु॥ साखर खाऊन समाधान जाहलें. साखरेचे रुपये ४० पाठविले ते पावले. व साबाजी नाईक यांचा कौल पाठविला तो पावला. व मोत्यें २५ पाठविलीं तीं पावलीं. विशेष काय लिहिणें ? संभाजी यादव व भिवजी यादव या हरदु जणांनी आह्मांस राजश्री दरबारी यत्न मात्र करून पाहिला. परंतु कांहीं चालेना. पुण्यास येऊन साबाजी राऊत न्हावी याणें डोकीच करावी! याचा पाट निघाला !! अवघा गांव बुडवून जाया न पडावा हा विचार करीत होते; परंतु कोठें चालिला नाहीं ! ते लबाड आहेत. वरकड बंदसोडीचे आंबे लावणीकारणें १ गतवर्षी:- इ० स० १७३७ ह्या वर्षी स्वामी आजारी होते त्यावरून हे पत्र इ० स० १७३८ सालचें असावें.