पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ वाड वसईस चाकर तुझांकडेस होता. तेथें युद्ध पडला. त्याजबरोबर त्याचे सोयरे संभाजी शेटगा मेहुणा व बाबाजी मोरे पडले. त्यांचे खबरीस तुझांकडे आगोटीस येसाजी गायकवाड पाठविला होता. त्यासी तुझीं त्याचे क्रियेस तिघांचे रुपये पन्नास दिल्हेत. ते घेऊन येऊन येसा- जीनें क्रिया तिघांची केलिया बालपरवेशी तिघांची चालवूं; पुढें येणें झणजे सवारों रुपये देऊं; ऐसें तुमचें वचन होतें. त्यावरून इल्लीं ये- साजी गायकवाड पाठविला आहे. तरी याचे बालपरवेशी बेगमीस सवारों रुपये वचनाप्रमाणे याचे पदरीं घालणें, व कांहीं वस्त्रपात्र बायकांस देणें. तुमच्या वचनाचा भरंवसा धरून यास पाठविला आहे. दिवसगत न लागतां याचे रवानगी करून पाठविला पाहिजे. मागें पन्नास रुपये तुझीं दिलेत ते कापून घेतलेले पाडेसार दिल्हेत. ते कोठें न चालत. पाडा दर रुपयास चव्वल मागत. मग आह्नीं ते रु- पये ठेवून मुबदला चांगले आपणापासून दिल्हे. ऐसेच इल्ह्रीं रुपये द्याल, ते तैसे न देणें. चांगले रुपये आपले दृष्टीनें पाहोन, पाडा न पडे ऐसे रुपये सवारों देऊन, याची रवानगी करणें. बोलल्या बोलास अंतर केलियास आझांस कोप येईल. ऐसें न करणें विशेष काय लिहिणें. हे आशा. [ लेखांक २८५] ● श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव मननिर्मल विजयीभव चिमाजीआपांस:- तुझीं पत्र पाठविलें, उत्तमकाळीं प्रविष्ट होऊन पत्रश्रवणें परम संतोष जाहला. केवळ वैकुंठींच वास जाहला ऐसा संतोष जाहला. कौरव पांडव द्यूत खेळोन पांडव वनवासास चालिले, ते समयीं कुंती श्रीकृष्णास बोलिली जे, तूं द्वारकेस चालिलास, आमची गत पुढे काय ? ते समयीं कृष्णनाथ बोलिला जे, मी कांहीं द्वारकेस जात नाहीं. अहर्निशीं १ लेखांक १४९ पहा. त्या पत्राचे हे उत्तर आहे. -