पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६५ १ , हित, स्वकीय इष्टजन कुटुंबसहित क्लेशयुक्त ऐसे असोन, त्याचें इष्ट आणि श्रीस्थानीं उत्साह पूर्ववत् पूजा आपणासही दर्शन घ्यावयास योग्य जेव्हां नव्हे, तेव्हां सर्व पुरुषार्थ तुमचे अयोग्य आहेत. बरें समजणें. उभयतां बंधु दिग्विजयी. पांडव अर्जुन श्रीकृष्णाचा मनोरथ पूर्ण करीत. आज्ञेत तत्पर, एकनिष्ठ सेवावृत्तींत लीन, ह्मणोनच भगवान त्यांचे हातून अरिमर्दन करून पृथ्वीचे इष्ट जन देव पालन करवीत. असें कर्ता तो ईश्वर, परंतु पांडवांचे ठायीं कृपा, याजकरितां यश त्यांस देववी. आमचा हेत कीं, तसीच तुझीं भावपुरस्सर आशा पालन क रावी. श्रीभार्गव स्वक्षेत्रीं नांदतसे, हाच पराक्रम सर्वोत अधिक आहे. तुमचे पूजेची इच्छा ह्मणावी तर तुझीं मनोदयानुरूप करावी. यांत अपूर्व काय ? लौकिकजन संतुष्ट करितात. भक्तराज खंडेराऊ यांस बरें वाटत नव्हते. त्याचा समाचार जातां घेतला. त्याणें अतिशयें लीन हो- ऊन श्रीस संतोषी केलें, पांच सात वस्त्रें श्रीस दिलीं तें बहुतच अपूर्व दिलीं. द्रव्यही उत्कृष्टच दिलें. तुझांस परस्परें कळलेच असेल. तुमचा जागली जेथें जाईल तेथें सर्व अनुकूलास उणें नाहीं. तुझांपासीं एवढा पराक्रम दिसतो ह्मणूनच तुझांयोग्य तुझांस सांगितलें. माझा वैकुंठवासी नाना माझे मनोरथ संपूर्ण करावयास पुन्हां जन्मास आला आहे. त्याचें भाषण काल ऐकिलें. याउपर चित्त संतोषी जालें. नाना माझा होता. तो एकनिष्ठ होता तर माजीस त्यास दिल्हा. सय्यदाचा सल्ला झाला. त्यामुळे इतकें अभीष्ट झाले. दिल्लीची मसलत सुरू झाली. एक मनोरथ त्याचा राहिला होता तो संपूर्ण करावयास तुझी आलां. त्याचा मनोरथ [पूर्ण करा]. [लेखांक २८४] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव चिमाजीआपा प्रधान यांसी आज्ञा केली ऐसीजे:- येसाजी गायकवाड याचा भाऊ बाबजीनाईक गायक-