पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ श्रीभुलोबाचे इमारतीचा लंगट लागला आहे व ताथवडा येथील काम बाजीचे पुण्यें आकारास आलें; तर यासमयीं जर मजला रुपये दिल्हे तर सुदामदेवाची गत जाहली. साडेतीन हजारांपैकीं पत्रदर्शनीं दोन हजार रुपये केसोबा व नारुजीजवळ देणें. दीड हजार राहों देणें. जरी दहा कोटी फौज घेऊन कोंकणांत जातेंत तरी ऐसें यश कोंकणचें न येतें. ऐसें पुर्ते आपले ठायीं समजणें. रावणासारिखा दैत्य मारिला ! नाहींतर मजला राग आला तर मी तुमचा नव्हे. नाना- बाबत साडेतीन हजार रुपये बाबत तुझीं मठांत उदक घातलें व बाजी- रायांनीं जेजुरीचे वर घातलें तर [ तें खरें करा? ]. [ लेखांक २८२ ] श्री. आपास आज्ञा ऐसीजे:- कोंकणांत पांच गांव इनाम दिल्हे होते व जकात पांचशे बैल यांची जकात देत होता. त्यास आमचे हातचा हत्ती वेऊन गेला [ह्मणून ] आझीं कपाळास कांठीं घेऊन वरघाटें आलों. त्यावर श्री भार्गवराजाच्या मनांत शिरोन पांच गांव वरघाटें दिल्हे, आणि विश्वजन पैके देतें. तुझांस आझीं तांदुळ मागितले ह्मणून बो- लिलें तर तुझी तांदुळ भक्षितां, त्याप्रतीचे तांदुळ माळशिरसीं पाठ- विले ह्मणजे तुमची निष्ठा खरी श्री भुलोबाची समाराधना करूं ह्मणजे श्रीभुलोबा भोजन करील. तें श्रेय तुझांस येईल. न मागतां सौ० वि- रूवाईनें दोन हजार रुपये दिले. हे आज़ा. ● [ लेखांक २८३] श्री. चिमाजीस आज्ञा. तुमचे फत्ते श्रीचे कृपेनें अमर्याद जाली. परंतु इतकेंही व्यर्थ दिसतें. कसें तर आपले जन्मभूमीचा स्वामी पूजेविर- १ भुलोबाचे इमारतीचा लगट लागला आहे ह्या उल्लेखावरून हे पत्र इ. स. १७३६ सालचें असावें. २ रावणासारखा दैत्यः- सिद्दी सात जंजिन्याच्या हवशांचा सरदार.