पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ , व इनामगांवाची वगैरे काय तजवीज करावी ह्याचा विचार करूं लागले. इकडे सिद्दी सात ह्यानें स्वामींनीं आपली मंडळी देशावर पाठविली हे पाहून, त्यांना व त्यांच्या देवस्थानास अधिक अधिक पीडा देण्यास प्रारंभ केला. स्वामींची कारकूनमंडळी देशावर निघून गेली ह्मणून इतर ब्राह्मण अगदीं भयभीत झाले, व तेही पळून जाऊं लागले. तेव्हां सिद्दी सात ह्यानें त्यांस अंजनवेलीस बोलावून त्यांना छ० १६ रबिलावल समान अशरीन ह्मणजे ता० १९ नोव्हेंबर १७२७ रोजीं एक अभयपत्र लिहून दिलें. तें येणेंप्रमाणे :- - “ हे कौलनामा अज सुभा मामले दाभोळ व प्र॥ राजापूर ता....... भटब्राह्मण वगैरान्यांनी कसवें चिपळूण मुहुर सन समान अशरीन मया व अलफ बादे कौलनामा ऐसाजेः- तुमचे बाबें सदाशिवभट अग्निहोत्री व आपा जोशी व वीरेश्वरभट व गोपाळभट थत्ते व महादेऊभट गणफुले साकीन कसबे चिपळूण सुभा किल्ले अंजणवेली मुकाम येऊन अर्ज केला कीं, गोसावी मु॥ परशुराम यांणीं आपले कारकून घांटावरी घालविले; वगैरा रयतही घाल- विली आहे. यामुळे भटब्राह्मण वगैरा रयत कसबे मजकूरची व पेढें मजकू- राची शकदील होऊन तजावजा जाली आहे. जरी साहेब मेहरबान होऊन कौल मन्हामत केला तरी भटब्राह्मण वगैरा रयत कसवे मजकूरची व पेढें मज- कूरची जागाचे जागा सुखरूप राहून कीर्दीमामुरी करील. ह्मणून अर्ज केला. त्यावरून खातिरेस आणून, मामुरीवर नजर देऊन, तुझांस कौल सादर केला असे. तरी तुझीं कोणे बाबें शक न धरितां बेशकपणीं कसबे मजकुरीं व पेढें मजकुरीं खुशाल राहणें. गोसावी यांनीं साल गुदस्तां आपले कारकुनांस घांटावर जावयाबद्दल दस्तकें घेतलीं आहेत. त्यास... ( साल गुदस्ता) गेले नाहीं. साल- मजकुरीं गेले. त्यांचे कारकून गेले तर गेले ! अगर गोसावी आहे. मन मानेल तेथें जाईल! त्याचें काय आहे? याच सबबीनें तुझीं तजावजा होऊन बेदिल व्हावें ऐसें नाहीं. तुझीं कसबे मजकुरीं व पेढें मजकुरीं बेशकपणें खु- शाल राहाणे. कोण्हे बाबें शक अंदेशा न धरणें दरिवा हे कौल असे. र॥ छ १६ रबिलाखर". ह्यावरून सिद्दी सात स्वामींविषयीं किती बेफिकीरपणाने वागत होता हैं दिसून येतें. “गोसावी आहे. मन मानेल तेथें जाईल! त्याचें काय आहे ” •