पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६१ भार्गवक्षेत्रीं जात नाहीं. वरघाटेंच समाधिस्त होऊं. जाणीजे. आंबे बनसोड नारायणगांवीं उत्तम इरसाल चांगले रुजवणीबद्दल पाठवून देणे. हे आज्ञा. [लेखांक २७८] श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं - ● सहस्रायु चिरंजीव विजयीभव श्रीसेवक आपा यांसी आज्ञा ऐसी- जे:- तुझांस पत्रे पाठविलीं, त्या पत्रीं दमाजीवर स्वारी करावी व कोंकणचें वर्तमान लिहावें. त्यास गाइकवाडाचें व कोंकणचें कांहींच उत्तर पाठविलें नाहीं. तर आजच कांहीं आझी नादान जाइलों नाहीं. बरें, उत्तर पाठविलें नाहीं तरी यांत कांहीं आमचें जात नाहीं. वरकड पूर्वीपासून तुह्मांस लिहोन पाठवितों व हल्लीं पत्र पा- ठविले आहे. तर राधाबाई व मानसिंग थोरात यांचें चालविल्यासी पृथ्वींतील सरदार जेवढे आहेत तेवढे सुखी होतील. राधाबाई अ- न्नास महाग जाहली. यासमयीं त्यांचा अभिमान धरून चालवि- ल्यासी श्री संतोषी होईल व आझी संतोषी होऊं. तर चित्तांत कोणे गोष्ट न आणतां चालविले पाहिजे. चिरंजीव रायांनीं येतांसमय पूर्ण रीत्यां त्यांसी आश्वासन दिल्हेंच आहे व आसीं लिहिले आहे. तर चित्तावर धरिलें पाहिजे. वरकड उदाजी पवार कर्ता सरदार आहे. पॅलीकडील वर्षी राजश्रींनीं उदाजीस रायगड प्रांतें शामलावर पाठविला. तो वाडी पाचाड येथें सिद्दी अंबर अफवानी याणें पांच- सातरों माणूस जमावानिशीं युद्धास उभा राहिला. तेसमयीं उदाजीनें १ राधाबाई थोरात इचें चालविण्याचें चिमाजी आपांनी लेखांक १२९ मध्ये मान्य केले आहे व ते पत्र इ. स. १७३६ मधील आहे. त्यावरून ह्या पत्राचें तेच साल असावें. न २ पलीकडील वर्षी:- इ. स. १७३५ मध्ये.