पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० • तुझ आझांकारणे उत्तम प्रकार कांहीं आणलेच असाल, ते विलंबें पाठवाल; तो आझी समाधीस जाणार. दहीरोज समाधीस राहिले. तुझीं जें अपूर्व त्याप्रांतींचें पाठवाल तें दृष्टभर पाहोन मग समाधीस बसों, ऐसें चित्त आहे. केसोबा पाठविला आहे. सांगतां कळों येईल. विशेष काय लिहिणें ? [ लेखांक २७७ ] श्री भार्गवराम. - मननिर्मल गंगाजल सत्यवक्ता एकवचनी सहस्रायु चिरंजीव विज यीभव चिमाजीआपा यांसी आज्ञा केली ऐसीजे:- तुझी खारीहून पुण्यास सुखरूप आर्लेत, हे वर्तमान ऐकोन मज आनंदाच्या कोटी झाल्या. वरकड तुझांस जें ईश्वरें दिल्हें तें मी कांहीं मागत नाहीं. पूर्वी तुह्मांस आह्नीं वस्त्रांविषयीं निरवणूक केली होती व पत्र लिहिलें होतें. त्यास तुझीं यत्न करून आणिलींच असतील. ते वस्त्रे बापुजी गणेश याजबराबर येणेप्रमाणे देणें:- २ पसमी दुलई उत्तम, १ सकलाद लाखी उंच, चार गज १ थीरमे सा हाती लांब, तीन हात रुंद जाडी, उंच, हातांस आली असली तर येणेंप्रमाणे पाठविले पाहिजे. वरकड कित्येक वृत्त जबानीं बापुजी गणेश सांगतां कळों येईल. जाणीजे. छत्रपति यांणीं श्रीस गांव उत्तम तुमच्या जिल्ह्यांत कोथळे अगर माळशिरस यांतून एक गांव उदक घातले आहे. राऊ निजामनमु लुकाकडून आलियावर सनदा करून देतील, ऐसें वचन राजाचें होतें. त्यास राऊ येऊन तांतडीनें राजपुरीस गेले. हल्लीं दो गांवां- तून एक गांवचे सनदा करून आपले मुद्रेनिश पाठवून देणें गई न करणे. जाणीजे. विशेष लिहिणें तर सुज्ञ असा. यंदा समाधीस - १ समाधीस दहा रोज राहिले ह्या उल्लेखावरून ह्या पत्राची मिति ता० १ माहे जुलई इ० स०१७३५ ही असावी. २ बाजीराव ता० २२ जिल्काद ह्मणजे ता० २६ मे इ० स० १७३३ रोजीं राजपुरीस गेले ह्यावरून हे पत्र इ० स० १७३३ च्या मे महिन्यांतील असावें.