पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ त्याचा मोड करून अफवानीचें शीर कापून आणिलें. महाड, बाण- कोट हस्त (गत) केला. सिद्दी साद यासी घास्त लाविली. राय- गडचे मुर्चे उठविले. मग गोवलकोटावर गेला. तेथेंही शर्तच केली. तो राजश्रीकडील बाबुराऊ यासी व उदाजी यासी न पटे ऐसें जाहलें, ह्मणून वरते आले. तर उदाजीसारिखा सरदार तुह्मां- कडेस आला, तर त्याचा सरंजाम करून चालविल्या तो लाखाचें यश देईल. आझी तुमचे जागली. तुझीं आमचे शब्द मानितां ह्मणून आझी तुझांस सांगतों. न ऐका तर मग आपणास लोकांमध्यें श्रीचें कां झणवितां व आझांस महत्त्व कशास देतां ? तुझी जाणते सुज्ञ आहां. विस्तारें काय लिहिणें ? हे आज्ञा. [ लेखांक २७९] श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव विजयीभव रामलक्ष्मण भक्तराज आपा यांसी आज्ञा केली ऐसीजे. श्रीनिवास केदार यांजबरोबर नवस देवाचा सवारों पुतळी निफांशी व सवारों रुपये मुगुटाचे पाठविले. त्यास निफांशी पुत- ळीया घेत नव्हतों. त्यास श्रीनिवास केदार यांणीं अर्ज केलाजे, स्वामीनें पुतळ्या घ्याव्या. फांशाचें सोनें पांच तोळे व सवारों मोयें, रुपयास एकप्रमाणे, आपांस सांगोन सोमाजी बरोबर पाठऊन देतो. त्यावरून पुतळ्या ठेविल्या. तरी पांच तोळे फांशांचें व मोयें सवाशें, रुपयाचे एकप्रमाणे, आधी पाठऊन देऊन मग वरकड देवांचे नवस देणे. जाणिजे. १ लेखांक ५३ चे चिमाजी आपांचे जे पत्र आहे त्यास हे स्वामींचें उत्तर दिसतें. ह्यानंतर लेखांक ५४ चे पत्र पुनः चिमाजी आपांनी लिहिले. त्यावरून ता० १३ मे इ० स० १७३९ व ता० १५ जून ३० स० १७३९ ह्या दरम्यानचें हे पत्र असावें. ह्याच समयाचें स्वामींचे आणखी एखादें पत्र असले पाहिजे असें लेखांक ५४ वरून दिसते.