पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५९ दिवस श्रीपासीं इच्छितों पैका नामर्दाचा इजत व यश मर्दाचें. चिरंजीव रायाचें वर्तमान वरचेवर मजला पाठवीत जाणें. तिळगुळाची खलिती श्री भार्गवाचे पादुकांवर ठेवून अर्पण केली. [लेखांक २७६] श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव - विजयीभव श्री रामसेवक हणमंत भार्गवसेवक उभयतां बाजीराव व चिमाजीआपा यांसी आज्ञा केली ऐसीजे:- आह्मीं पूर्वी तुझांस लिहीत असों जे, दोघे देव तुझीं उभयतांनीं भक्तिवादें नेले. आज तीन वर्षे लिहितों जे, तीन देव तुझांकडेस गेले. यंदा जीवावरील दुखणें गेलें मजकडेस देव असते तर मजला कां दुखणें श्री भार्गवाचे संगें- खाते तर तात्काल येतें १ एकला गणपति व भुलोबानें काय करावें ? - करून कडवईची पानें- ह्मणजे गुरु अगर कोणी मृत्यु प्राप्त होता-तीं पानें श्रीसंनिंध सेविलीं ! माझे निढळचा घाम पैका कान्होजी आंगरे यांणीं कांहीं बुडविला, कष्टी केलें; व शाम- लानेंही कष्टी केलें. तें तुझांस श्रुतच आहे. याची साक्ष घेणें. कोंक- णही तुझांकडेस जाइलें. तुझीं गतवर्षी साताऱ्याहून समाराधनेस सा- मान देविलें होतें तें, राजश्री छत्रपति व सौ० मातुश्री विरूबाई प्रताप- गडास गेलीं, तिकडून येतांसमयीं श्रीच्या दर्शनास आलीं. ते समयीं तुमचे सामानाचे सार्थकता जाहली. एक दिवस मेजवानी सांग केली. मग उंब्रजेस गेलीं. आतां तुमचें कांहीं नको. वसिष्ठाचा हेत जे हरिश्चंद्राचें सत्व रक्षोन चंद्रसूर्यपर्यंत दिग्विजय व्हावा, त्याचप्रकारें आमचाही हेत जे चंद्रसूर्यपर्यंत (तुमचा दिग्विजय ) व्हावा. हा हेत धरून तुमचें कल्याण श्रीजवळ नित्य करीत असों याची साक्ष अंतरीं मनोमन पहिलीच जाहली. तर श्री भार्गव तुमचे भाकेस गुंतला ऐसें समजणें. श्री भार्गवाचें विस्मरण न करणें. त्याप्रांतीं लिहून ● १ गतवर्षी:- ३० स० १७३४ ह्या वर्षी.