पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ परंतु तुमचें वचन मोडणार नाहींत. हे अवघे रघुनाथजीचे खेळ आहेत. जाणिजे शिवराम हरी आमचे जवळचा यास जुन्नरचे खाल- शाचे मजमू दत्त करून दिल्हें आहे. त्यास यंदाचा मुजमू मना के- लांत. त्याचेविशीं एक पत्र अंबाजीपंततात्या यांजवळ देऊन रवाना केलें होतें. त्याचें उत्तर न पाठविलेंत. ऐसें नसावें. हल्लीं त्याचें चा- लवणें आह्मांस अगत्य आहे. तें तुझीं अगत्य घरून वेतन पावणें ऐसे सनद गोविंद कृष्ण यांस पाठविली पाहिजे. तुझीं वेतन न द्या, तेव्हां आह्मांस पदरचें द्यावें लागतें. हें चित्तांत आणून लौकर उत्तर पाठविले पाहिजे. विशेष काय लिहिणें हे आशा. [ लेखांक २७४ ] श्री. . सहस्रायु चिरंजीव विजयीभव रामसेवक हणमंत श्रीसेवक उभयतां आपांस आज्ञा केली ऐसीजे:–मी जागली तुमचा आपला कुलस्वामी भजा ह्मणजे तुझा अंगरोग आणि जंजिरा, वसई हें कार्य झालें ऐसें समजा. चुनी लाल, उत्तम, दर ३ प्रमाणे किंमतीचे २० वीस चांगल्या पाठवून देणें माझें शरीर अशक्त जालें. अमळशी करमणूक करावयास दादाचा लेक जगन्नाथ पुराण उत्तम सांगतो. पोथी ऐकतो. त्याची सभासदांत असामी गतवर्षी पुरंधरीं घातली आहे. गतवर्षी दोनशे रुपये पावले. यंदा तुमच्या चित्तांत करार असामी आहे ते आहे. तुझांजवळ पाठविले तरी गुदस्ताप्रमाणें दो- नरों रुपये बिगी पाठवून देणे. ..... [ लेखांक २७५ ] श्री भार्गवराम. श्रीमत् भार्गवचरणेषु धीर रघुनाथाचा सेवक हणमंत रामलक्ष्मण दोनी बंधु. लक्ष कोटी रत्नमाणकें मजला दिलींयानें कांहीं माझी कीर्ति वाढत नाहीं. उभयतां दोनी बंधु रामलक्ष्मण तुमची फत्ते झाली झणजे त्रैलोक्यांत माझी कीर्ति जाहली. हेचि मी इच्छा रात्रं-