पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५७ आणि पवाराचें अगत्य आह्मांस आहे. जगजीवनाची बहिण खांसा सुंदराबाई दमाजीच्या भावास [ दिली ] आहे. तिकडे यास वग मोठी आहे. परंतु तुझे पदरीं आह्नीं घालितों. अवघ्या पवारांमध्यें तुझी कीर्ति होईल. द्दा कागद त्याजकडील कारकून आला आहे त्यास वाचून दाखवणे. [ लेखांक २७३ ] श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं - . मननिर्मल गंगाजल आचार्ये पुण्यशील भक्तराज बाजीराऊ प्रधान तथा चिमाजीआपा यांसी आज्ञा केली ऐसीजे:- तुझीं पत्र पाठ- विलें; माझें वचन आयकोन सकलाद देतों ह्मणून लिहिलें; को- टीचें यश तुमचे पदरीं पडिलें, मजला वाराणशींत रत्नाभिषेक केलांत ऐसा सुखी जालों. सांबशिवें अवतार धरिला, जसी ज्याची निष्ठा तसा त्यास प्रसन्न होतो. श्री भार्गव तुज सुप्रसन्न आहे. मी तुझा जागली आहे. तुझ्या पुण्यानें ढीग सकलादी आहेत. परंतु कारक- नाचें त्याचें पारडें फार भारी जालें कानोजी होता तो एकशब्दी होता. त्याचे आहारी कारकून होते. हे' आहेत ते कारकुनाचे आहारीं पडिले आहेत. यास तुझांस कांहीं सुचेल ते यांस बुद्धि सांगणें. आमचा इलाज नाहीं. आमचे भेटीस आले तेव्हां आझांजवळ मुरुडचे महा- जनकीचें वतन बापू गणेश बागूल यांस देतों ह्मणून नेम केला आणि सातारा गेलीयावर कारकुनाचें ऐकोन आतां देत नाहीं ह्मणतात. याजकरितां पुण्यास गेलीयावरी यत्न करून बापू गणेश याचें वतन महाजनकीचें सनद करून घेणें. बापू गणेश चाकर तुझा आहे. याचे महत्त्व वाढविल्यास श्री तुमचें वाढवील. माझें वचन मोडिलें, १ हे:-कान्होजी आंग्र्याचे चिरंजीवांचा संबंध दिसतो. हे चिरंजीव कोण ? सखोजी की संभाजी ? १७