पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ आह्मांस एका भक्तानें नारायण तेल पाठविले ते परभारें तुझांकडे रा माजीबरोबर पाठविलें आहे. घेऊन पावलियाचें उत्तर पाठवणें. नारायण तेल चांगलें कोठें मिळत नाहीं. किंकनेल तेल हाणून आमचे संग्रहीं आहे, तें वातास लावल्यास गुण येतो. तें पाहिजेसारिखें असेल तर सांगोन पाठवावें. पाठवून देऊं. वरकड तुझांपासून आलियावर आह्मांस सोळा हजार रुपये खर्च जाहले. आजवर आमचा खर्च चो- होंकडे कारखाने लागले आहेत. माझा रुका कोणीं उसना मागों नये. आह्मांजवळही द्यावयास नाहीं. दसरापावेतों येथें राहोन कोठून कांहीं ऐवज रुपये आले तर खर्च चालेल. नाहीं तर दसरा जाइलियावरी भिक्षेस निघोन जाऊं. विदित जाहले पाहिजे. जगजीवनराव पवार जर तुझांकडे येईल तर त्याचे मनानुरूप सरंजाम करून त्यास आ णावा. पवार मर्दाने, पुरातन आहेत. जगजीवन कर्ता, तरवारेचा शूर आहे. त्यास हत्ती देऊन बहुमान करून आपणाजवळ आणिल्यास तुमची कीर्ति होईल, आणि आमचें वचन ऐकिलें असें होईल. होळ- कराचा मूल तुझांकडे आला आहे. त्यास आणि जगजीवनास कोटीचें अंतर आहे. इतक्या पवारांमध्ये तुमची कीर्ति होईल. तीन हजार रुपये तुझांकडील लौकर येत सारखें करा. तुझांस तीन वर्षांचा कौल आहे. तीन वर्षे कांहीं तुझांजवळ मागत नाहीं. पांच मोहरा ठेविल्या तरी आझांस नलगे. नाहीं तर आमची पैदास्त नये. दसरा पावेतों आझी येथें आहों. कोठून कांहीं ऐवज आला तरी खर्च चालेल. नाहीं तर दसरा जाहलियावरी कोटें भिक्षेस जाऊं. तुझांस कळावें ह्मणून लिहिले आहे. एका भक्तानें पद्म देवास दिले आहे. त्यास पाचा पा हिजेत. इतकें जवाहीर तुर्की हत्ती भरून राजास आणून दिलेत. पाचा जर दहा दहा रुपयांच्या आठ पाठवून द्याल तर पद्मास लावून देवास अर्पण करूं श्रेय तुमचे पदरीं पडेल. रुपये रोख देऊं. या गोष्टीचें