पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक २७१ ] २५५ श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव बाजीराऊ प्रधान यांसी आज्ञा केली ऐसीजे:- कृष्ण जोशी बिन विश्वनाथ जोशी चिपळूणकर तुमचे शालक यांस देवघेव कारकूनांहीं आह्मां न कळत केला. पैसे श्रीचे दिले. त्याचा परिणाम होतां त्याचें दिवाळें निघालें, त्यास चिमाजीआपा व तुझीं त्याचें कर्ज वारावयास सा हजार रुपये प्रस्तुत द्यावयास पुण्यास केले आहेत. जोशी यांचा निरोप कारकुनास आला जे, कतबे घेऊन आपा- कडेस • पुण्यास येणें ; तुमचा कजिया वारून देतील. त्यास कारकून माझे जाणार कोण? यांणीं जाऊन काय करणें आहे ? रुपये येणें श्रीचे, याज- करितां हें पत्र तुझांस लिहिले आहे. कतबे व हिशेब तुझांकडे पाठविले आहेत. मुद्दल देणार, तर पावलें तें लिहिले आहे. वजा करून उरले रुपये द्या, अगर तेथून आणऊन पाठवून द्या. परंतु आपाकडे कोणी जाणार नाहीं. माझे रुपये तुहीं उगऊन येथेंच द्या. तुमचे उपकार आह्नांवर होतील. विशेष लिहिणें तरी सुज्ञ असा हे आशा. मुद्दलपैकीं रुपये ७१७|| सातरों साडे सतरा तीन आणे येणें ते आह्मांकरितां तुझींच येथें द्या. कतबे व हिशेब पाठविला आहे हे आज्ञा. सदरहू खेरीज गु॥ चिमणाजी व्याज येणें रुपये ४७. एकूण रुपये ७६४|| येणेंप्रमाणें येणें असेती. हे आज्ञा. [ लेखांक २७२] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयी भव रघुनाथजीस आज्ञा केली ऐसीजे:- १ कृष्णजोशी विन विश्वनाथ जोशी चिपळूणकरः- ह्यास बाजीरावांचे शालक असें झटले आहे त्यावरून हे कृष्णराव जोशी चासकर कीं काय ? बाजीराव झांचे मेहुणे चासकर जोशी ह्यांचें नांव कृष्णराव महादेव असे प्रसिद्ध आहे तेव्हां हे जोशी कोण ?