पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ [ लेखांक २७० ] श्री. सहस्रायु चिरंजीव रंघुपतीस आज्ञा. विश्वजन असें ह्मणतें, वांचोन काय देवळें बांधावीं आहेत. शास्त्रे तुझी सांगतां आणि आज्ञा तुझी मोडितां, याचें काय होईल ? हें तुमचें तुह्मांस कळतच आहे. शब्द- पांडित्य आझांसी बोलतां, जे आहे तें स्वामींचे आहे; आणि घातो- पोषण वर्ततां ! रडतियाचीं आसवें पुशितां ! तुझींच आमचा वाक्षेप केला ! परंतु बरें वाईटसें काम देवळाचें गोठणेंचें मुस्तैद जालें. पूर्ण- गडीं देवळास आरंभ केला आहे. होईल कीं नव्हे हे श्री आधीन आहे. तुलीं पुराणें ऐकतां तुह्मीं ब्रह्माचे लेंक आहां. परंतु आह्मी कवडीचे माणूस आहों !! वाईटसें भार्गवाचें स्थळ सिद्ध झाले आहे. माझे आई, माझा बा, माझें इमान, आतां मी कोणाचे गळां मिठी घालूं? तुझीं बोलिलेंत जे, सातारा गेल्यावर हजार रुपये तळ्याचे कामास देऊं; तर तेही नाहींत ! धावडशी ही माझी कांहीं मिरास नाहीं. जिकडे जाऊं तिकडे मिरास आमची. बरावाईट जे कोणी माझे तिळीं आले नाहींत ते थैल्याच्या थैल्या पाठवितात. येरवी तीन हजार रुपये महिना खर्च कोठून पुरता ? जो कोणी आज्ञाभंग करील...[फाटलें आहे.] दोष कल्पांतीं नाहीं ! तुझीं लिहिलें कीं, उभयतां भेटीस आले तेव्हां आह्नीं राजकीय धंद्यांत होतों. अलीकडे जाते समयीं यावें तर अ नुकूल पडलें नाहीं झणून लिहिलें; तरी तुझी कशास याल ? XXX [ फाटलें आहे. ] १ बाजीरावास स्वामी श्रीरामाची उपमा देत असत व चिमाजीआपास लक्ष्मणाची उपमा देत असत. त्यावरून हे पत्र बाजीरावाच्या नांवाचे असावें असें दिसतें. ह्या पत्रामध्यें स्वामींच्या मनाची स्थिति व पेशव्यांवरील रोष हुबे- ● हुब चित्रित झाला आहे. स्वामींच्या मर्जीप्रमाणे कोणीं वर्तन केलें नाहीं ह्मणजे बहुषा त्यांची रोषयुक्त मुद्रा होत असे.