पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५३ , नाहीं ! कुलाबाही तुमचाच आहे. आज नाहीं उद्यां येईल. कर्नाळा माहुली घेतली असतीत तर चौकडे कीर्ति होती. सातारा दुष्टबुद्धि जे आहेत, त्यांचें राजास कळों येतें. वरकड आह्मीं, गुलाबशिसे उ- तमसे तीनचार पाठविलेंत तर बरें होतें, जिवास बरें वाटत नाहीं, यास्तव लिहिलें होतें. आमचे जिवास मधीं कांहीं बरें वाटतें. कधीं वाटत नाहीं. वरकड वर्तमान यथास्थित असे. लिहावें ऐसें नाहीं. हे आज्ञा. [ लेखांक २६९] श्री. . चिरंजीव बाजीराऊ प्रधान यांसी आज्ञा आह्नीं तुझांस सांगितलें होतें जे, कोथळ्याच्या सनदा बेगी पाठवून देणें व कांहीं वस्त्रे पाठ- वून देणें. वस्त्रें औरंगजेबा २, सकलाद उत्तम १, पशमी थान दुलई व कुडती करावयास २ येणेंप्रमाणें पाठवून द्या झटले होतें. बाजी, आज्ञा मोडूं नको. काय, राहों येथें कीं जाऊं एखादेकडेस ? काशी- बाई आश्विनमासापासून कुणग्याची म्हैस पाठवित्ये; त्यास कृष्णराऊ याजकरवीं कागद बाईस लिइविला जे, बाई, तुझांस पुत्र जालियावर दोन म्हैसी पाठवून देणें हें भविष्योत्तर पहिलेच वाग्देवता वदली होती. इल्लीं पुत्र जाला ह्मणून लिहिले, बहुत उत्तम जालें. कृष्णराऊ याचे आमची गोडी वीरमाडेयांत जाली. त्यास बोलिलों जे, बाईस पुत्र जालियावर तुह्मांस उत्तम वस्त्र देऊं. त्याजकारणें वस्त्र ठेविलें होतें, तें दुर्जनसिंगास दिल्हें. वरकड भेटीचे समयीं तुझांजवळ आह्मीं काय मागितले ? तुझींदी अपूर्व वस्तवानी काय आणून दिलींत ! आझी तुमचे स्नेहाचे भुकेले. नवाबाचे भेटीस गेलेत, तेव्हां बोलिलों जे तुमचे फत्ते जाली तर आपले देवाचें नांव घेणें. तैसेंच तुझीं राज- पुरीं प्रांतास स्वार.. ..[ फाटलें आहे ].