पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ - बाजीराव व चिमणाजी आपा. श्रीभार्गवराम. [लेखांक २६७] श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव बाजीराव बल्लाळ प्रधान यांसी आज्ञा केली ऐ- सीजे:- जकात शाहाबाडा परगणे असेर येथील जकातीचा अंमल नाना कैलासवासी यांचें दत्त आहे. त्याप्रमाणें तुझींही चालवीत आहां. ये वर्षी धामधुमीच्या प्रसंगामुळे तेथील अंमल उठला होता. सांप्रत तां- बाचें व तुमचें सख्य जालें. या उपरी अंमल बैसलेच असतील. तरी हल्लीं श्रीस्थळींहून राघो बल्लाळ पाठविला आहे. यांसी जकात मजकूरच्या सनदा आपले शिक्यानिशीं करून देणें. खानदेशप्रांतींचा सुभा बाबती व सरदेशमुखीचा करून गेले असतील. त्यास ताकीद- पत्र व जमेदारांस पत्र देऊन रवानगी करणें. तुझांस श्रीचा प्रसाद मोहाचीं शाहाळीं सुमारें ४ पाठविली आहेत. घेणें बहुत काय लि हिणें हे आज्ञा. याचे समागमें धोंडो महादेव यास जकातीच्या धं- द्याचा साहित्यउपराळा करावयास पत्र देणें बहुत काय लिहिणें हे आज्ञा. [ लेखांक २६८ ]* श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव बाजीराऊ यांस आज्ञा. राजमाची, कोथळा किल्ला तुझांस आला. हे किल्ले घरचेच होते! यांत अपूर्व १ नाना: बाळाजी विश्वनाथ पेशवे. २ तांब: मोंगल भोपाळची लढाई होऊन निजामाचें व मराठ्यांचें सख्य झाले तो प्रसंग की काय ?

  • हे पत्र लेखांक ११५ ह्या पत्राच्या पाठीमागे लिहिले असून त्यावर पैव-

स्तीची तारीख छ २२ जिल्काद शनिवार ही आहे. त्यावरून हे पत्र ता० ८ माहे मार्च ३० स० १७३५ ह्या मितीचें असावें व हें लेखांक ११५ ह्यास उत्तर असावें अर्से दिसतें.