पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५१ पेशवे. राधाबाई. श्री. [ लेखांक २६५ ] गंगाजान्हवीसमान मातुश्री राधाबाई यांस आज्ञा:- जागली मीं, देखों सकतां कीं नाहीं ? श्रीचे कोटीस मीठ पेण बंदरीं उभयतां चिरंजीवांहीं वीस खंडी देविलें. वीस खंडी मानाजी आंगरे यांणीं दिलें. त्यास तुमचे वीस खंडींपैकीं तुमचे कमाविसदार दहा खंडी दे- तात. याकरितां त्यास नशेद - ( निषेध ? ) पत्र देऊन आपले तर्फेनें वीस खंडी मीठ पत्रदर्शनीं श्रीचे कोठीवाले यांचे पदरीं घालणें. वीस खंडी मानाजी आंगरे यांणीं दिलें. एकूण चाळीस खंडी कोठी भरून येईल. आपले तर्फेनें वीस खंडी मीठ द्यावयास अनमान न करणें. जा णीजे. हे आशा. आणखी तुमचें मी फारसें मागत नाहीं; परंतु मीठ तरी पोटभर वीस खंडी खाऊं द्या. देवाचें काम चालों द्या. कण खालल्यास त्याचे उतराई होत नाहीं. याजकरितां मीठ मागी- तलें असे. उभयतां चिरंजीवांचें फत्तेचें वर्तमान लिहोन पाठविणें, तरी सविस्तर लिहिणें. [लेखांक २६६] ● - श्री. मननिर्मल गंगाजल गंगाजान्हवीसमान मातुश्री राधाबाई पेशवी यांस आज्ञा केली ऐसीजे:-चिरंजीव आपांहीं दुलई पाठविली ती उंच आहे. तैसीच विरूबाई यांणीं पाठविली तेही आहे. परंतु तुझीं इलखी दुलई वाराणसीचा ताता, चौतार, कोणेक वजा, लाल, पिवळा, बदामी, जसा असेल तशाची, अगर बंगाली ताप्ता, उत्तम, दुतार, चौतार, ज्या वजेचा असेल संजपी असो- त्याची दुलई आंत अस्तर पसमी घालून, सा हात साडे सा हात लांब, तीन साडे तीन रुंद याप्रमाणें चित्तास येईल तर करून पाठविणें. जाणीजे.