पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

O ठण्यास गेले. तेथे कान्होजी आंग्र्याची भेट घेऊन ते गोमांतक प्रांतांत गेले. व तेथून कोल्हापूर मार्गानें फाल्गुन महिन्याच्या वद्य पक्षांत धावडशीस आले. स्वामी ह्या वेळीं गोमांतकांत कोणत्या उद्देशानें गेले हे समजत नाहीं. धा- वडशीस आल्यानंतर स्वामींची व शाहु महाराजांची फाल्गुन वद्य ९ रोज बुधवार ह्मणजे ता० ६ मार्च ३० स० १७२७ ह्या दिवशीं भेट झाली. ह्या भेटीचें वर्णन स्वामींनी कान्होजी आंग्र्याच्या पत्रांत लिहिले आहे (लेखांक २०१). त्यावरून शाहु महाराजांची स्वामींविषयीं सप्रेम भक्ति होती असें दिसून येतें. ह्या वेळीं स्वामींनीं शाहु महाराजांजवळ आपला सर्व वृत्तांत निवेदन केला असावा. तो ऐकून महाराजांनी महाराष्ट्रांत राहण्याबद्दल स्वामींचें मन वळविले असावें असें अनुमान होतें. स्वामी ज्येष्ठ मास पुनः परशुरामास आले. परंतु त्यांस सिद्दी सात याचें वर्तन सौम्य व सरळपणाचें न वाटून, उलट फार भयंकर दिसूं लागले. तेव्हां त्यांनी आपली कारकूनमंडळी व त्यांची कुटुंवें धावडशीस पाठविण्याची व्यवस्था केली; व आपण एकटेच परशुरामी राहून देवाच्या दागदागिन्यांची आमचे बारा हजार रुपये व वानीवस्त देवळीहून नेली व कितेकांस कष्टी केलें. आणखी कितेक आह्मांवर तुफानें घेतली. हें वर्तमान खानास कळतांच त्यास पत्र पाठवून नशेष करून आमची वानीवस्त फिरोन दिली. ऐसें खानाने आमचें चालविलें. आझांस खानानें पत्र पाठविले जे, 'हुजूर मुलाखत येणें. आणखी दोन गांव दुसरे देतो.' त्यास आझांस जावयासी अनुकूल पडले नाहीं. जर जातों तर दोन गांव देतेच. ते कांहीं चुकतेना. बरें, गत गोष्ट गेली! हल्लीं आमची कोठी परशुरामीं होती. ती हवशी यांणी नेली. भात खंडी १० व नागली खंडी १० वगैरा गेले. देवाचा नगारा व भांडीं ( तोफा ) २ व दरवाजा थोरला नेला आहे तो फिरोन द्यावा. भार्गव कोंकणचा राजा. श्रीपतराव उदंड यत्न करून चिट्या बालीत. त्यासी नये ह्मणून सांगितलें. सिद्दी साद बोलिला जे, “जर वेढा मरा- ठ्यांचा उठला तर बारा गांव इनाम देतो, व पहिर्लेपरिस अधिक देवाचें चालवूं." ऐसें बोलिला. लोकांस पुसोन पाहणे. एवढे काम जाइल्यावर मग भेटीस येणे, वकिलास भेटीस आणितां तर त्याचे प्रयोजन भेटीचे काय ? लिहि- ल्याप्रमाणे मान्य केलें तर आक्षी मान्य असों. हे आज्ञा.