पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० तुमच्या राज्यांत न तोडावीं तर कोठून आणावीं? स्वर्गीहून आणावीं कीं काय ? आझी कांहीं आंबे, साग, बिबवी कामाचें लांकूड तोडीत नाहीं. कामाचें नव्हे तें तोडितों. ऐशास देवळ बांधावें ऐसें आपले वि चारें असेल तर मोरघर, देवखोल, बजेगांव जेथें लांकूड डोंगर असतील तेथें तोडावीं ऐसें आपले मुद्रेनिशीं चिठी पाठवावी. यमाजी शिवदेव लोणारीयांस ह्मणतो, खंडीस सा रुपये घेतां यांतील तीन आपणास देणें ; तर लांकडें तोडूं देईन. यास आह्मी पैके देतों त्यांतील यास मागायास दरकार काय आहे ? चित्तांत आणून [करणें तें करा.] [ लेखांक २६४ ] श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सौ० संपन्न मातुश्री विरूवाई यांसी आज्ञा केली ऐसीजे:- मी कोळी झालों आणि तुझीं उष्टीं बोरें खादिलीं. तो अभिमान तुझांस असों देणें. तुझीं राजाकडून आह्मांस सिंहासन दिले. तुझांस ईश्वरें सिंहासन तक्त दिलें. तुझीं खुशाल सिंहासनीं बसणे मला जर पालखी हवी असती तर कानोजी आंगऱ्यानें जे पालखी राजास दिली, त्या पालखींत बसवून एकीकडे आपण खांदा घेतील व एकीकडे खांसा राजा खांदा घेतील ते पालखी मजला अपिली. ते मज जर हावी असती तर मी घेतों कीं न घेतों ? मजला पालखी नलगे. कांहीं नलगे. तुझीं सुखी असावें हेच माझी पालखी असे, जबानी केरोजी सांगतां विदित होईल. जाणिजे पालखीचा सरं- जाम राजास हाटले कोथळेगांव देणे. त्यास बोलिला जे, चिंचवडच्या देवास नसले तर तुझांस देऊं. त्यास कोथळेगांव निमें सचीव, निमें बाजीराव दमाजीस आहे. राजाचें वचन खरें करणे असेल (व) मजला पालखींत बैसविणें असेल, तर कोथळेच्या सनदा केरोजीजवळ करून पाठवणे. नाहीं तरी मला पालखी नलगे, पालखी पाठवूं नये.