पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४९ • ह्मणाल, तर ज्यापाशीं द्रव्य आहे तो द्रव्य देऊन उतरतो. ज्यापाशीं द्रव्य नाहीं तो कष्टी होऊन माघारा जातो. ऐसे चार महिने लोक पावसाळचे श्रमी होतात. याकरितां चार कमाना बांघाव्या. पांच सात कामें जाहलीं ह्रीं तुझांस पुसोन केलीं. हल्लींही पत्र पाठ- विलें आहे. तर आपले पतीस सांगोन निरेस दादर बांधा- वयासी सांगणें. दादरास द्रव्य फार पाहिजे. त्यासी चार घरें आणखी चौ दिशांस मागोन तुमचें नांव सांगोन काम चालवूं. दादर तुमच्या कीर्तीचा आहे. नांव तुमचें आहे. आह्मी फुकाचे तुमचे जागली. तर आपले पतीस पुसोन दादर बांधावयाविशीं पत्राचें उत्तर पाठविलें पा- हिजे. बाई, बसापा आदले जन्मीं पुण्यपुरुष होता ह्मणून ये जन्मीं त्यासी श्रीनें वासना दिली आणि द्रव्य आपलें शिखरास लाविलें येणेंकडून तो जीवन्मुक्त जाहला. त्याचे पुण्यास पारावार आहे ऐसें नाहीं. इतके लोक पृथ्वींत आहेत, परंतु ज्याचें देव घेणार त्याचेंच घेऊन त्याचा जन्मोद्धार करितो. तुझी तो सुज्ञ आहां. विशेष लिहिणें नलगे. हे आशा. तुझी उत्तम अन्न दुध भात जेवितां. आह्मी कंदमुळे खातों. आह्मीं जेवावयास तुमची मज असेल, तरी भुईमूग आह्मांस एक मण पाठवून दिले पाहिजेत. [लेखांक २६३ ] श्रीभार्गवराम. सौ० मातुश्री विरूबाई यांस आज्ञा केली ऐसीजे:- श्रीचे देवालयाचा कारखाना सात आठशे माणसें खपतात. इमारतीस चुना कोळसे पाहि- जेत. त्यास वावगें रान देवखोल व मोरघर या गौवीं लांकडें तोडीत असत. त्यास यमोजी शिवदेव यांणीं लांकडें तोडावयाची लोणारांस मना केलें आहे. ऐशास देवळाचें काम घरिलें तें टाकतां नये. लांकडें - १ यमाजी शिवदेवः – मुतालिक ह्यांच्या विरुद्ध स्वामींची तक्रार ह्या पत्रांत आहे.