पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ साखर एकत्र करून एकवीस रोज ध्यावें. पुत्रसंतान श्री देईल. यास वोशघास पथ्य कांहीं नाहीं. लौकिकीं कोणास कळों न द्यावें. निष्ठेकडून घेतल्यास श्री पुत्रसंतान देईल. भाव पाहिजे. ऋषीगुंगे जैसें पिंडभागांतील विभाग कौसल्या, सुमित्रा, व कैकयी यांस दिले होते, त्यांणीं भावार्थे घेतले, त्यांस पुत्रसंतान जालें; तैसें भावार्थी घेतल्यास पुत्रसंतान होईल. [ लेखांक २६१ ] श्रीभार्गवराम. विश्वरूप मातुश्री पार्वतीसमान सौ० संपन्न मातुश्री सगुणाबाई यांस आज्ञा. तुझांस भार्गवप्रसाद पादुकाजोड पाठविला आहे. घेतला पाहिजे. रघुजी भोंसले यांजकडील कारभारी भास्करपंत यांजकडे तीन हजार रुपये वाग्दत्त रघुजी भोंसल्यांचे येणें आहेत. त्यांजकडे माणसें कोणी जातील त्यांस लिद्दोन तीन हजार रुपये आणविले पाहिजेत. खर्चास पाहिजेत याजकरितां त्वरेनें आणविले पाहिजेत हे आशा. [ लेखांक २६२] मननिर्मल गंगाजल श्रीभार्गवराम. पुण्यपवित्र सौ० संपन्न ऋषीश्वराची माता मातुश्री विरूबाई यांसी आज्ञा ऐसीजे:- बहुत दिवस जाहले, तुझां- कडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. आमचें वृद्धपण जाहलें. तुमचे पुण्ये दद्दापांच कामें वाईट बरीं जाहलीं तीं तुझांस श्रुत जा- हलीं. हल्लीं आमचा हेत आहे जे निरेस दादर बांधावा. काय निमित्य १ पृष्ठ १७९ लेखांक १६६ मधील २ री टीप पहा. २ निरा नदी पुणे जिल्ह्यांत वाहत असून जेजुरीपासून पिंपरी व माळशिरस ह्या गांवांस जातांना मध्यंतरी लागते. तेथें पूल बांधण्याचा स्वामींचा हेतु होता. ह्याप्रमाणे पूल बांधण्याचे काम सिद्धीस गेलें नाहीं. ह्यावरून हें पत्र स्वामींच्या कारकीदींतील अखेरचें असावें.