पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४७ कीं तुमचें अन्य जन्मींचें सुकृत होतें, तर मज देवानें भुली घातली, आणि तुमच्या आश्रमास अकस्मात् आणिलें, आणि उपदेश जाहला. याचें सार्थक करा. इतकी तुझांस भिक्षा पदर पसरोन मागतों. तुझीं भांडों नका. निरापराधी कोणी शिवी देईल ते गुरास लागेल. क्षमारूप धरत्रीनाम तपस्वीरूप योगीनाम संत संत संत धर्मानाम तर पहा, पहा, त्या पांड- वाचे कीर्ति अद्याप आहे. पुढे चालेल ऐसी कीर्ति तुझीं उभयतां करा. आणि संसाराचा कांहीं भरोसा नाहीं. जसा दीपक मालवल्यास कांहीं नाहीं. , [ लेखांक २५९ ] श्रीभार्गवराम. सौ० संपन्न मातुश्री सगुणाबाई यांसी आज्ञा केली ऐसीजे:- आह्मीं गेलों होतों जे, नबाब मोंगल यास भेटोन त्यापासून गांव मागोन पालखींत बसोन तुझांस मुख दाखवावें. त्यास त्याची भेट न जाइली. याजकरितां राहतां राहिलें. खालें कोकणांत होतो त्यास त्याजवळचे चार गांव इनाम देऊन कसें चालवीत असत तेंही तुझांस वि दितच आहे. बाजी होते ते ह्मणत जे, किलीजखानास तुझांस नेवून भेटवितों; आणि पांच गांव इनाम देऊं. त्यास तो मरोन गेला. एरवीं देविता. तुमची खातर निशा होती. तुमचें सत्पात्रीं देव तुमचें घेईना. कुपात्रीं द्यावें ऐसें तुमचे मनांत होतें, याजकरितां कुपात्रीं देतां! * [ लेखांक २६० ] श्रीभार्गवराम. - योगीराज योग्याची माता रेणुका माता सौ० संपन्न मातुश्री सगु- •णाबाई यांस आज्ञा केली ऐसीजे: – ईश्वरी कृपेनें पुत्रसंतान व्हावें ऐसे - वोशध हातास आलें तें पुडिया २१ पाठविल्या आहेत. प्रत्यहीं प्रातः- काळीं तोंड धुवोन एक पुडींतील वोशघ तितकीच वजन रायपुरी बाजीराव मृत्यु पावल्यानंतरचें ह्मणजे इ० स० १७४० च्या

  • हें पत्र

पुढचें असावें.