पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ तो अगत्यच नाहीं ! आझी निलाजरे, ह्मणोनच तुमच्या राज्यांत राहतों. परंतु कोणास बूज नाहीं. वरकड तुझीं गतवर्षी व यंदा दोन वेळां पूजा केलींत. दोनी वेळां पूजेसमयीं मौजे सोनगांव व मौजे धामणी हे दोनी गांव भार्गवाचे पायाखाली आहेत, त्यांचें उदक तुर्की घातलें जे, श्रीस अर्पण दोनी खेडर्डी केलीं. दोनी गांव मिळोन आकार ह्मणाल तरी साडेचारशें पांचरों पावेतों कदाचित् होईल. त्यास तीं खेडीं दोनीं भागवाजवळून कितीसीं लांब आहेत तीं आपल्या लक्ष्मणरावाजवळ पुसावें. तो सत्यच सांगेल. तुझीं तो तेच समयीं उदक घालून देवास अर्पण केलेंतच; परंतु दोनी गांवचीं दोन अक्षरें आझांस लेडून पाठवणे जे, सोनगांव व धामणी हे दोनी गांव देवास दिल्हे. ऐसें . लेहून पाठवणें हाणजे गांव आह्मांस पावले. विशेष हे आज्ञा. [ लेखांक २५८ ] श्रीभार्गवराम. · सहस्रायु चिरंजीव महाराज छत्रपति महाराज ज स्वरूप, यांस कोणी मनुष्य ह्मणेल तो नरकास जाईल. ५. जो मंत्र तारक सांगितला आहे तो निष्ठेनें जपणे झणजे पुत्र झालेंच ऐसेंच समजणें. तुझीं आपले गुरूचे पायाची क्रिया केली आहे. छत्रपतीशीं भांडो ना. तर आह्नीं निरवानिरव केली आहे. भांडल्यास हा देश टाकीन आणि गोमुत्र तुझांवर टाकीन. राजाशीं तुझीं भांडिलांत नाहींत ह्मणजे विश्वजन सुखी होईल. ऋषीश्वराचे पायाची क्रिया केली आहे. तुझीं जें जेवण कराल तें राजास अमृतासमान लागेल. आणि तुमचें राजाचें एकचित्त नाहीं ह्मणजे तुझीं सोन्याचा ग्रास केला तरी राजास विषसमान वाटेल. मागे तुझांस आशीर्वाद दिला तो खराच होता. त्यास कोर्णी आक्षेप केला असेल त्याचें काय झाले असेल तें ईश्वर जाणे. काय तुमच्या वडिलांचें पुण्य, काय जाणों छत्रपतीचें पुण्य