पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४५ [ लेखांक २५६ ] श्रीभार्गवराम. आकाश पडों पाछे तरी तुझीच वाट पाहे. तोंडें मानिली रेणुका ते मातेहून अधिक, सौ० मातुश्री सकवारबाई यांसी आज्ञा ऐसीजे:- धामणी, सोनगांव व धालवली कोंकणप्रांर्ते आहेत. ह्या तीन गांवच्या सनदा आपल्या शिक्क्यानिशीं पाठवून देणें चिंतलें कार्य श्री भार्गव सिद्धीस नेईल. तरी तीन गांवच्या सनदा पाठवून देणें. वाचादत्त चार हजार रुपये देऊं केले (ते पाठवून देणें १). श्रेय तुमचे पदरीं पडेल. तुला मीं रेणुका शब्द मानिली, ते मातेहून अधिक ऐसें आहे. तरी, चित्तास नये तरी मैत्री तोडणें. जामदारखान्यांत पासोडी कुजेल माझे अंगांत पासोडीची रजई करून घातली ते बरी ? तरी घरून विचार करावा. श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं पन्न वज्रचूडेमंडित, वदली आकाशाची वाणी, ज निर्वाणी, मातुश्री सखवारबाई मज जोडिलीस पुण्याची रणुका; ऐशास बाई, तुली राज्य करितां, मी तुमचा जागली, चार कामें तुमचीं करितों. तुझीं हाणजे केवळ कलयुगीचे कर्ण, ऐसें असोनं चार हजार रुपयांस हवाले देतां, हें बाई काय ? अमृतवाणी ईश्वराची कदापि लटकी करूं नये. तरीच कर्णाची कीर्त दिगंतीं राहिली. गत वर्षी एक पलंगडी व एक रेशमी नवार व परवां एक जरी डगला व रजई मागितली होती. त्यास छिटी बुटेदार तरी डगलें द्यावें होतें. रजई मागितली होती त्यास ह्रींव तेंही निघोन गेलें ! बाई, आमचे जीवास बरें वाटत नव्हतें. जीव दोन चार वेळां व्याकुळ जाहला होता. परंतु तुमच्या पुण्यानें कांहीं उतार जाहला. तुझींच महाराजास पाठवून आपणाजवळ नेऊन आझांस बरें केलेत. नाहीं तर तुमचे भ्रतारास