पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ यास मारिलें. वाडियांत कारकुनावरी भुतें घालून वाडियांत दुखणें हो- ऊन कारकुनाचे घरीं माणसें मरतात. गुरें वासरें कुल मेलीं. त्यास देव भगत सुवर्णदुर्गाहून आणून निवडिलें. भगतानें सांगितलें, धावड- शीकर अंबाजी पाटील याचे नि॥ भुतें चेटक १, जखीन १ येणेंप्रमाणे दोन भुतें वाडियांत नास करितात. भगतानें पाटिलास सांगितलें जें, आपण सांगतों त्या वारणें. ते न वारीत. कतबा लिहून मागितला जे, याजपुढे जर कांहीं लाग झाला तर दिवाणचे गुन्हेगार. तो कतबा लिहोन न देत. ऐसे पाटील लबाड आहेत. मजला आटोपले नाहीं. गांव लागोन वर्षास पांचरों साशें रुपये खंडणी देतात. ऐसें चालवून मज हे कामास आले ! हें दुःख कोणास सांगावें ? याजकरितां तुझांस लिहिले आहे. अंबाजी पाटील यास नेऊन याचें पारिपत्य बरेंसें केलें पाहिजे. याचें पारिपत्य न करा तरी, मज आज्ञा कराल तर मी जातों. जबानीं सोमाजी सांगतां विदित होईल. हे आ श्रीभार्गवराम. एखादेकडेस [ लेखांक २५५ ] - योगभ्रष्ट योगमाता सौ० सकवारबाई रामाजीराऊ याची लेकी यांसी आज्ञा केली ऐसीजे: – कोंकणांत श्रीसन्निध धामणीगांव व सो- नगांव दोनी मिळोन हजार रुपयांचे गांव आहेत. त्यास देवें अंजनवेली तुझांस दिली तर दोनी गांव आपले तरफेनें श्रीस अर्पण करावे. या लोकीं दिल्यास कीर्ति होईल; परलोकीं कामास येईल. मागें छत्र- पतीस मिरजेच्या मुक्काम हाटलें जें, आंब्याचा बाग लावावयास धाव- डशीजवळ एक चावर द्या. त्यास छत्रपति बोलिले जे, मिरजप्रांतें गांव तुझांस देतों. त्यास आह्रीं झटलें, मिरजप्रांतें नलगे. तुझांस पुत्र जाइली- यावर मग पांच गांव मागों ते द्या. जो गांव आंबडसासन्निध आहे तो श्रीचीं गुरे ठेवावयास देणें. देवानें बहुत वनवास भोगिला आहे. तुझीं तरी देवाचें चालवावें. देव कामास येईल.