पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वामींनीं पाठविलेलीं पत्रे. शाहूमहाराज व त्यांच्या राण्या. श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंसस्वामी यांहीं [ लेखांक २५४ ] सहस्रायु चिरंजीव - विजयीभव शाहुजीराजे छत्रपति यांसी आज्ञा केली ऐसीजे: – येथें खारी तुमची होत्ये व सरकारकून सरदार आमचे भेटीस येतात. त्यास, धावडशीकर पाटील याजपासून कवडी आपण घेत नाहीं. पलीकडील वर्षी आपण गवत कुरणांत काढीत होतो तेव्हां पाटिलांनी, मीरशिकाराची चाहडी सांगितली याजकरितां, मीरशिकार

  • स्वामींनी लिहिलेली बरींच पत्र आह्मांस उपलब्ध झाली आहेत. परंतु ती

संगतवार नसल्यामुळे मागील पत्रांप्रमाणेच त्यांचा व्यक्तिवार क्रम लाविला आहे. ह्या पत्रांवर कोणत्याही प्रकारें कालबोध होण्यासारखे वार किंवा मिति ह्यांचें सा- धन नसल्यामुळे त्यांची नक्की तारीख, महिना, अथवा सन ठरविणें बरेंच कठीण आहे. तथापि कांहीं पत्रांतील मागच्या पुढच्या संदर्भावरून त्यांची मिति ठरवि- ण्याचा यल केला आहे. हीं पत्रे अस्सल पत्रांच्या नकला असाव्यात असे वाटतें. कारण, ती बहुतेक धावडशी येथील दप्तरांत सांपडली आहेत. ह्या पत्रांचे हस्ता- क्षर बहुतेक स्वामींचे शिष्य चिमणाजी कृष्ण व जगन्नाथ चिमणाजी ह्यांचें आहे. खुद्द स्वामींच्या स्वदस्तुरचें असें पत्र शाहू महाराजांस लिहिलेले एकच सांपडले आहे. हीं पत्रे फार प्रेमळपणानें लिहिलेली असून तीं स्वामींच्या स्वभावाचें खरें स्वरूप दाखवितात. ह्या पत्रांच्या योगानें स्वामींच्या कारकीर्दीतील राजकीय गो- ष्टींचाच इतिहास नुसता व्यक्त होत नसून, त्या वेळची सामाजिक स्थितिही चांगली व्यक्त होते. , १ मीर शिकार:- शाहूमहाराजांस शिकारीचा फार नाद असे. त्यामुळे त्यांचे- जवळ उत्तम उत्तम शिकारी असत. त्यांत मीर शिकार हा प्रमुख असे.