पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ ● केल्या असा. त्यास सातारा पालीचे पाथरवट दोघे तिघे तुमचे भेटीस येऊन त्यांहीं मुद्दा घातला. याची हकीकत व तुर्की त्याशीं करार केला असा याची हकीकत लेहून मल्हारजी पाथरवट सालकर सरनाईक याचा भाई यास हुजूर पाठवून त्याचा मुद्दा खातरेस आणून त्याचा दिलासा करून मुद्याप्रमाणें कौल यास देऊन रवानगी केली पाहिजे; ह्मण दसरा होतांच पाथरवट घेऊन मल्हारजी हुजूर येईल हाणून लिहिलें. मुफस्सिल मालूम जालें व मल्हारजी पाथरवटही हुजूर येऊन पोहचला. त्याणें आपले मुद्दे जाहीर केले. त्यावरून त्याचा दिलासा करून पाथर- वटास कौल दिला असे कीं, तुझीं काय करावयास येणार ते सुखरूप येणें. सहा सात महिने काम करून जेव्हां जाऊं लागाल तेव्हां सुख- रूप जाणे. तुझांस अटक होणार नाहीं. तुझीं कोणे बाबें शक अंदेशा न धरितां सुखरूप येणें. ऐसा कौल देऊन मल्हारजी पाथरवट याची रवानगी केली असे. पाथरवटाचे नाइकानें तुझांस तैनातीविषय लिहिलें होतें त्याचे बाबें लिहिलेंत, तर ते प्रमाणें तैनात मुकरर केली जात नसे. नाइकास महिना रुपये १० वगैरा पाथरवट यांस कारिगर देखून महिना मुकरर केला जाईल. व दोनशे रुपये आगाऊ मागत आहेत ह्मणून लिद्दिर्ले. त्यावरून हुजुरून रुपये दोनशें पाथरवटास रवाना करावयाबद्दल तुह्मांनजीक तुमचे आदमीयासोबत पाठवीत होतों. अम्मा तुमचे आदमी- यानें रहदारीचे सबबेनें कबूल केलें नाहीं. याकरितां अंजनवेलीचे पोतांतून रुपये २०० दोनशें हुजुरून मुजरद आदमी पाठवून तुह्मांनजीक रवाना करविले आहेत. ते पैसे तुझांनजीक तिकडून येऊन पोहचतील. ते याचे पदरीं घालून रवानगी करणें. बादज जे पाथरवट येतील ते हुजूर रवाना करावयाबद्दल इजत आसार सिद्दी साद सुभेदार या नजीक पाठविणे. ते गलबतावर हुजूर रवाना करतील. हे बाबें सिद्दी मशारनिल्हेसही परवाना सादर केला असे. दराज काय लिहिणें. रवाना छ० २९ माहे मोहरम सन ९ जिलूस हे किताबत.