पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४१ रावयास हुकूम केला पाहिजे हाणून लिहिलें, तर सन सबाचा वसूल सरकारांत पोहचला तो पोहचलाच. अम्मा हल्लीं गांव तुमचे तुझांला आहे कीं नाहीं तें लेहून हुजूर पाठवणें; व कळंबुसी गांव मेहरबान होऊन आह्मांस इनाम देत होतेंत, त्यास कोर्णी इस्कील केली. त्याचा मुब- दला दुसरा गांव देत होतेंत. ऐशास मौजे डोरलें व महाळुंगे ता० पावस सुभा राजापूर हे हरदु गांव मराठे यांकडून आह्मांस इनाम आहेत. त्यांस खराब होते. वसाहत करावयाकरितां सन खमसामध्यें सुभ्यांतून गांवास कौल मक्ता खंडी दरसाल रुपये ४२ बेचाळीस प्रमाणे करार करून पांच हजार कौल सुभेदारासही दिला. तेणेंप्रमाणे आज तीन सालां वसूल दिला. हल्लीं सालमजकूर सन समानचे खंडणीचे कौला- प्रमाणें बेचाळीस रुपये सरसुभा अंजनवेलीस रवाना केले होते; ते पोतां- जमा झाले, आणि हुजत गांवास दिली नाहीं. लेहून पाठविलें कीं, तुमचे गांवीं बिगर खंडणीची रयत जाऊन राहिली आहे, व बाधेयानें कीर्द केली आहे. त्याची खंडणी साल मजकुरीं मुकरर होणें ते देशकांचे निसबतीनें मुकरर जाली असे. त्याचा वसूल होणें तो अलाहिदा होईल ह्मणून लिहिले असे. याकरितां दोन्ही गांवची खंडणी कळंबुसीचे मुत्र- दला इनाम चालविल्यास आह्मांस गांव पोहचला आणि हरदु गांवास तसदी कोणे बाब न द्यावी ऐसा परवाना सादर करावयास फर्माविलें पा हिजे ह्मणून लिहिले. मालूम जालें, व हरदु गांवचा कौल तुझांस कागद सुभ्याचा आला होता तो ऐसें हुजूर पाठविलें. त्यावरूनही जाहीर जालें. तरी हरदु गांवची खंडणी तुझीं रुपये ४२ लिहिले असा अम्मा सुभ्याचे दसरीं काय असे. ते लिहून हुजूर आणविली असे. 'इनशा- अल्ला हुताल्ला,' हरदु गांवचे बाबें सरंजाम पोंहचविला जाईल. चिल फैल कौलमूजिब दोनही गांवची खंडणी घेत जावी. जाजती कोणे बाबें तसदी न द्यावी ह्मणून सुभ्यास परवाना सादर केला असे. व गांवचा कौल तुमचा कागद ऐसे दोन्ही कागद फिरोनं तुमचे आदमीयानजीक दिले असेत. दिगर पाथरवटाचे तलासाबद्दल तीन चार जोड्या रवाना ● १६