पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ श्री भार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांचीं:- - - सहस्रायु चिरंजीव नारो विठ्ठल प्रभु यांसी आज्ञा केली ऐसीजे:- तुझ पत्र पाठविले प्रविष्ट होऊन लिहिले वर्तमान विदित जाहलें. अद्यापि दमाजी गायक- वाड या करवीं तुमचें बरें केलें नाहीं, आणि तुमची इतकी निष्ठा बैसावयासी कारण काय ? चिपळूणचें सविस्तर वर्तमान लिहोन पाठविलें. तर आझीं कांहीं तुझांस सांगितलें नाहीं, आणि तुझीं स्वतःच लिहोन पाठविलें. येर्णेकरून आ- मची तुझांस पोटतिडीक आहे ऐसें दिसोन आलें. रुद्राजी कर्ता आहे. तो घरीं- हून फिरोन येईल. ज्येष्ठमास येतों ह्मणून कबूल केले आहे. तो आलियाउपरी त्यासी सोनगडास पाठवूं तो दमाजी गायकवाडही सोनगडी येतील. तुमच्या कामास चुकणार नाहींत. दरबारची बोली छत्रपति बोलिले तें लिहिलें. तर फार उत्तम. दाभाड्याचा मजकूर लिहोन पाठविला. तर होणारास उपाय नाहीं. वासनेसारिखें फळ प्राप्त होतें. दोन तीन वर्षे कोठें पर्यटणास गेलों नाहीं. खर्च तो अनिवार, कारखाने चालिले पाहिजेत. याकरितां बाजीराव आले ह्मणजे पुढे स्वारीस जाणार. तुझीं कोंकणचे कामांत मन घातलेत. उत्तम जाइलें, परंतु वकिलाजवळ बोली करून येणेंप्रमाणे करून आणविलें तरीच आझी मान्य असों, नाहींतर आह्मांस तरी अगत्य काय ? पेढें, आंबडस, नायसी, कळंबुसी इतके चार गांव दरोवस्त कुलबाब कुलकानू खानानें आह्मांस परवाने करून देऊन सुदामत चालविले. त्याच प्रकारें ताजे परवाने पेढें, आंबडस व नायसी कळंबुसी ह्या चारी गांवचे परवाने कुलवाव कुलकानू दरोबस्त द्यावे. सिद्दी सुरूर उंदेरीस किलेदार होता. तेव्हां आमचा दुवा घेतली. मग तख्त जंजिरा जाहला. मग तो आमचें फारसें चालवाववासी लागला. तिनी गांव दिले. कळंबुसीच्या सनदा जाहल्या. शिके करावे तो सिद्दी सात यांणीं अंदेशा सांगोन पाठविली. त्यावरून सनदा राहिल्या. आह्मीं वरघांटें आलों. तर इल्लीं चौ गांवच्या सनदा आणून द्याव्या. सिद्दी साद याणें आझांस इत्तीस पाठविलें. आह्मी इत्तीस जाऊन इत्ती आणिला. तो इत्ती आंगरे यांणी आह्मांपासून नेला. फिरोन मागती आंगरे याकडून हत्ती आणून सिद्दी साद यासी दिला. ते समयीं ,