पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३९ जाब आणवून मोहिब्याकडे रवाना केला जाईल. मालूम जालें पाहिजे. दराज काय लिहिणें प्यार मोहबत असों दिली पाहिजे. रवाना छ० १० माहे मोहरम हे किताबत. [ लेखांक २५१ ] ● हु. द्रबावा फकीर मुक्काम चिपळूण. "" मोहब्बत व मजमूअ इबादत वादज शौक आंके दरींविला कि- ताबत पाठविली ते पोंहचोन मजमून मुफसल जाहिर होऊन आला. तुझीं चिल्यांतून उठलेयाची खबर लिहिली. मालूम जाली व दुपट्टा कुसंबी १ एक बराबर गोपाळ त्रिमल व मल्हारी पाठविला तो येऊन पोहचला. दराज काय लिहिणें रवाना छ० ९ माहे रबिलावल सन १३ जिलूस. हे किताबत. [ लेखांक २५२ ] इलाही मेहेरबान आजम अकरम परमहंस गोसावी उमर जादाहु. अजंदिले एखलास सिद्दी मसूद मुक्काम बंदर सुरत सलाम बादज सलाम महवल मकसूद अं येथील खैर खुशी बनजर जाणून मोहिब्बीं आपला खैरसल्ला हमेशा कलमीं करावयास फर्मावीत असले पाहिजे. दिगर मोहिब्बीं कमाल मेहेरबानी करून किताबत पाठविली ती नेकसात येऊन पोंहचोन दिलताजगी हासिल जाली. ते जाणोन बिलकुल मोहिब्याची मुलाजमतच जाली. ऐसी खुशवक्ती गुजरली तर येच वजा दोस्ताची याद करून खत किताबत पाठवून खबर अंतर घेत असले पाहिजे. दिगर मोहिब्बीं लिहिलें कीं राजपुरीस किताबत व तीन कपडे पाठविले होते व लिहिलें होतें कीं, नबाबाकडे खान होते ते वक्तीं त्यांहीं आ- सिद्दी मसूदः— हा हबशांच्या आरमाराचा अधिपति असून त्यांच्या वतीनें सुरतेस होता. हा मोठा कर्तृत्ववान् पुरुष असून त्यानें सुरतेस हबशांचा अंमल बसविला होता. -