पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ रबानीच चाहत असों, दराज काय लिहिणें प्यार मोहबत असों दिली पाहिजे. रवाना छ० २८ जिल्हेज हे किताबत. [ लेखांक २४९ ] आजम अकरम गोसावी मुक्काम धावडशी दाम मोहबतहु. अज दिले एखलास सिद्दी साद सुभेदार सलाम बादज सलाम खैर अंजाम सु || इसन्ने सलासीन मया व आलफ आंके, येथील खैर सल्ला जाणून मोहिब्बीं आपला खैरसला कलम करीत असले पाहिजे. दिगर मोहिब्बीं किताबत पाठविली ते नेकवक्त पोंहचोन... मुलना हुसेन पेढेकर हरएक बाबें गावांत दगदगा देतो ह्मणून तपसीलें कलमीं केलें तें आयां जाहलें. ऐसीयासी ये बावें अवल मोहिब्बीं कलमीं केलें होतें त्यावरून त्यास ताकीद फर्माविली होती. अंमा तो खपती, दिवाणा, बेशौर जाहला असे. त्यामध्यें कांहीं शौर राहिला नसे. नाहींतर मोहिव्याचे गांवीं हरकोणी दगदगा करील त्याचें पारपत्य व्हावयास राहील ऐसें होणार नाहीं. दराज काय लिहिणें प्यार मो- हचत असों दिली पाहिजे. र| छ० ३० सवाल हे किताबत. [ लेखांक २५० ] आजम अकरम गोसावी परशराम मोहबतहु. अज दिले एखलास सिद्दी हिलाल किल्लेदार कोट गोंवळ ठाणें चिपळूण सलाम बादज सलाम खैर अंजाम सु० सन सलास सल्लासीन मया व अलफ आंके, येथील खैर खुशी जाणोन मोहिब्चीं आपली खैर आफीयत कलम करीत असले पाहिजे. दिगर मोहिब्बीं किताबत पाठ- विली ते पोंइंचली. तेथें कलमीं केलें जें, धावडशीहून निघोन छ० ९ मोहरमीं दरग्यास आलों, व अंजनवेलीस सुभेदार यास कागद लखोटा पाठविला, येवढा पोहोंचावून जाब आणणें हाणोन कलमीं केलें तें आयां जाहलें. मोहिब्याचे लिहिलीयाचें मोजिब लखोटा अंजनवेलीस पाठवून