पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३७ सालमजकूर सन इहिदेची खंडणी मुकरर जाहली त्यापैकीं तेतीस रुपये रसद सुभां पाठविली असे; आणि हल्लीं गांवींहून परभारें वरातदारांहीं पैसे घेऊन सुभ्यास नेले असेत ते फिरोन देववावे ह्मणून कलमीं केलें. त्यावरून हरदु गांव पैकीं रसद रुपये ऐन रुपये १२० एकशेवीस व खुर्दा टक्के ७॥ साडेसात आले होते. त्यांपैकी खंडणीची बाकी साल मजकुराबाबत रुपये ऐन २७ सत्तावीस व खुर्दा पोतदारी टक्के १॥९ दीड टक्का नऊ रुके येणें होती. ते वजा करून बाकी पैसे बरा- बर महादजी साठल्या रुपये ऐन ९३ व्याण्णव व खुर्दा टक्के ५ ॥ ३ पावणें सहाटके तीन रुके देऊन मोहिब्याकडे रवाना केले असेत. व सदरहु सत्तावीस रुपयांची हुजतही पाठविली असे. तरी पैसेयांची पोंहच पाठविली पाहिजे. दराज काय लिहिणें प्यार मोहबत असों दिली पाहिजे, रवाना छ० ४ रबिलावल हे किताबत. ● [ लेखांक २४८] आजम अकरम गोसावी मुक्काम धावडशी दाम मोहबतहु. अज दिले एखलास सिद्दी साद सुभेदार सलाम बादज सलाम खैर अंजाम आंके येथील खैरसल्ला जाणून मोहिब्बीं आपला खैरसल्ला कलमीं मरकूम करीत असले पाहिजे. दिगर मोहिब्वीं किताबत मरसूल केली ते नेकवक्त पोंहचोन खुशवक्ती हासील जाहली. ऐसीच हरवक्त खत किताबत कलमीं मरसूल करून शादमानी पोहचावीत असले पाहिजे. कलमीं केलें कीं, मौजे डोरलें व महाळुंगें ता० पावस आमचे गांव, तेथें विशाळगडाहून दगदगा जाहला. त्यामुळे रयत तजावजा जाली असे. त्यास कौल मरहमत जालीयानें रयत कीर्दमशागतीस लागतील ह्मणून कलमीं केलें. त्यावरून हरदु गांवचे रयतीस कौल पाठविला असे. आझी खाले लवकरच येणार असों मुलाकतीस येऊं झणून कलमीं केलें तरी बहुत खूब असे. ईजानेबही मोहिब्बाची मेह-