पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ [ लेखांक २४६ ] हु. आजम अकरम गोसावी मुक्काम धावडशी दाम मोहबतहु. अज दिले एखलास सिद्दी साद सुभेदार मुक्काम गोंवळकोट स- लाम बादज सलाम खैर अंजाम आंके येथील खैर सल्ला जाणून मो- दिब्बीं आपला खैर सल्ला कलमीं केला पाहिजे. दिगर मोहिचीं कि- तात्रत पाठविली ते पोंहोचोन खुषवक्ती जाहली. आपलीं गुरें तिसंगीस होतीं तीं सुमार सर १११ स्वारीचे लोकीं नेलीं आहेत, तीं देविलीं पाहिजेत ह्मणून तपशीलें कलमीं केलें. तरी मोहिब्याचे गुरांवर स्वारी पाठवून आणविलीं जातील असें तो होणार नाहीं. आंगऱ्याकडील चा- करमानें यांचीं गुरें विवलीचे खिंडींत होतीं. त्यांवर स्वारी गेली होती. तीं गुरे घेऊन आले. त्यामध्यें कित्येक गुरें तर सरकारचे चाकरमाने यांच साल गुदस्ता वयाजी महाडिक यांण नेलीं त्यांमधील असेत. तीं ज्यांचीं त्यांनीं वोळखिलीं मोहिब्याचीं गुरें अव्वल तिसंगीस होतीं तेथें हल्लीं नसेत. तशाहीमध्यें येथें गुरें आणलीयावर आंगऱ्याच्या मा- रफतीनें तफहुस करितां मोहिब्वाची गुरे यांमध्यें नसेत झणून आंग- ज्यानें मालूम केलें. जर मोहिब्वाचीं गुरे यांमध्यें आलीं असतीं तर मोहिब्याचे जागा याची विशाद काय होती? अलवत मोहिब्वाचे लि हिण्यावरून पाठविलीं जातीं. दराज काय लिहिणें ? प्यार मोहबत असों दिली पाहिजे. रवाना छ० ६ जमादिलाखर हे किताबत. [ लेखांक २४७] आजम अकरम गोसावी मुक्काम परशराम दाम मोहबतहु. अज दिले एखलास सिद्दी साद सुभेदार सलाम बादज सलाम खैर अंजाम आंके येथील खैर सला जाणून मोहिब्बीं आपला खैर सल्ला कलम करीत असले पाहिजे. दिगर मोहिब्बीं किताबत पाठविली तेथें कलमीं केलें कीं, मौजे महाळुंगे व डोरलें ईजानेबाचीं गांवें, तेथील