पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३५ [लेखांक २४५] आजम अकरम गोसावी मुक्काम परशराम मोहबतहुः- अज दिल एखलास सिद्दी साद सुभेदार सलाम बादज सलाम खैर अंजाम सु॥ सल्लासीन मया व अलफ आंके, येथील खैर सल्ला जाणून आपला खैर सल्ला कलमीं केला पाहिजे. दिगर किताबत पाठविली ते पोंहोचोन लिहिला मजमून मालूम जाहला. गांवींची रयत डावाडोल जाहली आहे ह्मणून लिहिलें, त्यावरून मौजे पेढें आंबडस हरदु गांवचे रयतीस कौल सादर केला आहे. रयतेचा दिलासा केला पाहिजे. आंब डसचा तेली परागंदा जाहला ह्मणून कळविलें, त्यावरून त्यासही गांवीं यावया बाबें कौल सादर केला असे. मौजे पेढ्याचे तेलीयानें बुत- परस्ती केली सबब त्यास सुभ्याहून गुन्हेगारी करार जाहली आहे. त्या- पकीं पंधरा रुपये बाकी राहिले आहेत. त्याचा तगादा करितात आणि तेलीयापासीं ऐवज नाहीं हाणून कलमीं केलें. तर मुसलमान होऊन जो बुतपरस्ती करील त्यास सजा तो खिताबमोजिब आणखीच आहे. लेकिन त्यास गुन्हेगारी मुकरर केली आणि रजा दिली होती. ऐसें असतां हल्लीं मोहिब्यीं त्याचे बाबें कलमी केलें. त्यावरून सदरहु पंधरा रुपये मना करून मनाची चिटी पाठविली असे. हरएक बाबें चालवावें झणून कलमीं केलें; तर दोस्तीचे जागां तजावज आहे ऐसें नसे. दराज काय लिहिणें ? प्यार मोहबत असों दिली पाहिजे. र० छ० १९ जिल्हेज हे किताबत. - १ सिद्दी साद ह्याचें सिद्दी सात असेंही नांव मराठी कागदपत्रांत सांपडतें. हा हबशांचा पराक्रमी सरदार होता. ह्याची व चिमाजी आपा पेशवे ह्यांची ता० १९ एप्रिल इ० स० १७३६ मध्ये कुलाबा जिल्ह्यांत चन्हई गांवीं लढाई होऊन हा मारला गेला. २ सीत सल्लासीनः - इ० स० १७३५.