पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ लोकांचा आशीर्वादच असो. बहुत काय लिहिणें, स्नेह बहुत असला पाहिजे. रखाना छ० १५ माहे जमादिलाखर हे किताबत आपणाकरितां स्त्रे- हाचे ठिकाण कृष्णाजी नरहरि यांजबराबर शेला अष्टगोली पैठणी कुसुंबी एक पाठविला आहे. आपणाजोगा नव्हे, परंतु कृपा करून स्वीकार केला पाहिजे. बहुत काय लिहिणें. र० छ० मजकूर हे किताबत. [ लेखांक २४४ ] आजम अकरम गोसावीबावा परशराम मुक्काम धावडशी दाम मोहबतहु. अज दिले एखलास सिद्दी याकूत किल्लेदार किल्ले गोंवळकोट ठाणें चिपळूण सलाम बादज सलाम येथील खैर अंजाम सुरसन इंहिदे सलासीन मया व अलफ आंके येथील खैरसल्ला जाणून मोहिब्बीं आपला खैरसल्ला हरवक्त कलमी मरकूम करीत असले पाहिजे. दिगर चंदरोज गुदस्त जाहले, अंमा याद करून खत किताबत पाठवून दिलास खुपवक्ती पों- इचविली नाहीं. तरी ऐसें वाजवी नसे. यावादज आलेल्या आदमीया- सोबत खत किताबत पाठवून शादमानी पोहचावीत असले पाहिजे. बादज ईजानेबाचे जागा भाई आजम सिद्दी हिलाल यास हुजुरून सरफराज करून रवाना केलें ते येऊन पोहचले. आझी छ० १५ जि- ल्कौदी खार होऊन हुजूर रवाना जालों. मोहिब्बास मालूम जालें पा हिजे. ते जागा दूरचे पल्लीयावरी असलो तरी निविस्ते याचे राहोन खबरअखबार घेत असले पाहिजे. खत किताबत पाठवावें. यास फरा- मोसी केली न पाहिजे. दराज काय लिहिणें, प्यार मोहब्बत असों दिली पाहिजे. रवाना छ० १५ जिल्काद हे किताबत. १ इहिदे सल्लासीनः - इ० स० १७३० ३१. २ छ० १५ जिल्कादः - ता० ११ मे इ० स० १७३१.