पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

W २३३ वत्प्रमाणे प्रांताची वस्ती होय ऐसें केले पाहिजे. यांत आपली बहुत तारीफ आहे. बहुत काय लिहिणें रवाना छ० ५ माहे सावान सन २६ जिलूस हे किताबत. [ लेखांक २४३] आजम अकरम गोसावीबावा संस्थान परशराम मुक्काम धावडशी दाम मोहबत हुः - अज दिले एकलास सिद्दी याकूत सुभेदार सुभा मामले दाभोळ व प्रांत राजापूर सलाम बादज सलाम खैर अंज्याम आंके येथील कुशल जाणून आशीर्वादसहित स्वकीय कुशल लिहून संतोषवीत असलें पा- हिजे. यानंतर सय्यद याकूब जमादार याचे समागमें आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समय प्रविष्ट होऊन लिहिला मजकूर कळला. तुझ पूर्ववत्प्रमाणें चालून गांवशीव पूर्वी ठरले आहेत ते करार करून संस्थानचे चालविलेत, तरी संस्थानचा बंदोबस्त होणें काय कठीण आहे ह्मणून लिहिलें, त्यावरून सविस्तर कळलें. ऐसीयास तुझीं आशीर्वाद देणार भगवद्भक्त मनुष्य संस्थानचे ठिकाण असल्यास पूर्वीप्रमाणें चालणार नाहीं अशी काय गोष्ट आहे ? पहिलेपेक्षां अधिक चालेल. तुझांसारखे साधु लोकांचे चरण लागल्यानें आणखीही कित्येक लोकांस सुख होईल. येविशीं निःसंशय. आपले संस्थानास यावयाची तरतूद करून आले पाहिजे. तुझी आल्यावर तुमचे गांवशीव जे आहेत ते तुझांकडेस खास चालवूं. पहिलेपेक्षां अधिक चालवण्यास अंतर होणार नाहीं. या प्रकरणीं रा० कृष्णाजी नरहरि आले आहेत. हेही आह्मां- कडील स्नेहाचीं बोलणीं बोलतील (त्यावरून) कळों येईल. तुमचा साधु १ वरील पत्रांत सिद्दी याकूत सुभेदार ह्मणून ज्याचा उल्लेख आहे तोच हा माणूस होय. हा दाभोळ व राजापूर येथील सुभेदार असावा असे दिसतें. ह्याचा व स्वामींचा लेह होता.