पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ कामांची सर्वराय मोहिब करतील. ऐसी दोस्तीचे जागां ईजानेबांस येकिन आहे. हल्लीं मोहिबों कलमीं केलें यावरून हत्ती व तहिफे आणावयास येथून कृष्णाजी नरहरी व संकराजी तानप्रभू वगैरे लोकां व सोबत मोहिवीं दस्तकें पाठविलीं होतीं तीं देऊन मोहिबांनजीक रवाना केले आहेत. हे मोहिबांनजीक पोहों- चल्यावर मु[ख?] जवानी दोस्तीचे सकून आयां करितील, त्यावरून मालूम होईल. तर तवजेःकरून यांसोबत स्वारांचा दरया ठिकाणलग देऊन, तिकडून आरामसीर हत्ती घेऊन येत ते बात केली पाहिजे. दराज काय लिहिणें ? प्यार मोहबत असों दिली पाहिजे. रवाना छ० २७ रबिलावल हे किताबत.” ह्या पत्राची मुसलमानी तारीख छ० २७ रबिलावल सन सबा अशरीन ह्मणजे ता० ११ माहे नोव्हेंबर इ० स० १७२६ ही आहे. ह्या पत्रावरून हत्तीची आख्यायिका अगदर्दी खरी आहे हे चांगले सिद्ध 'होतें. • स्वामी परशुरामास येऊन व तेथील छिन्नविछिन्न प्रकार पाहून नंतर दंडा- राजपुरीस सिद्दी याकूदखान ह्याच्या भेटीस गेले. तेथून सिद्दी सात ह्यास तंबी देववून व देवाची मालमिळकत परत मिळविण्याची व्यवस्था करून ते गो- १. स्वामी महाराष्ट्रांत येऊन धावडशी येथे राहिल्यानंतर जंजिन्याच्या हव शांनी त्यांस परशुराम येऊन राहण्याबद्दल अनेक पत्रे पाठविली व त्यांची परोप- रीनॅ विनवणी केली, हे स्वामींच्या व हबशाच्या पुढे झालेल्या पत्रव्यवहारावरून दिसून येतें. (लेखांक २४०-२५३ पहा). स्वामीही त्यांच्यार्शी गोडीगुलाबीनें वागून आपला कार्यभाग साधून घेत असत. कारण, स्वामींचा संबंध तिकडे असल्यामुळे त्यांस हरहमेशा त्यांच्याकडून त्रास पोहोचण्याची भीति असे. मराठ्यांचीं व हबशांचीं जीं राजकारणें घडून आलीं त्या सर्वामध्ये स्वामींचें बरेंच अंग असे. अशाच राजकारणनिमित्तानें स्वामींनीं नारो विट्ठल प्रभु नांवाच्या कोंकणांतील मुत्सद्यास एक पत्र लिहिले आहे. ते इ० स० १७३१ मधले असावे असे वाटते. ह्या पत्रामध्ये स्वामींनी गायकवाडाकडील कांहीं मज कूर लिहिला असून पुढे हवशासंबंधाचा मजकूर लिहिला आहे. त्यांत इत्तीच्या भांडणाचा उल्लेख करून त्याचें थोडक्यांत सिंहावलोकन केले आहे. ह्या एका पत्रा वरून आह्मीं वर दिलेल्या हकीकतीस उत्तम पुष्टि मिळते. ह्मणून हे पत्र जसेच्या तर्सेच येथे दिले आहे:- -