पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२७ त्रिंबकराव दाभाडे सेनापति कामास आले. आणिक कितेक दुतर्फा लोक कामास आले झणून मोघम वर्तमान सांगितलें तपशीलें कागदपत्र आले नाहीत. आलियावर स्वामींस लेहून पाठवू. विदित झाले पाहिजे. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना. . [ लेखांक २३७] श्री. . श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेबेसी:- चरणरज अंबाजी त्रिंबक कृतानेक सा० नमस्कार विनंति उपरी स्वामींच्या आशीर्वादेंकरून ता० छ० २२ रजवपर्यंत कुशल असो विशेष स्वामींनीं वेदमूर्ति राजश्री प्रभाकर जोशी या समागमें आ- शीर्वादपत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन बहुत समाधान जाइलें श्रीचा प्रसाद खजूर ८. दहा शेर व सुपारी रोठे सुमारें ३५ पस्तीस व मीरें ८८॥ अच्छेर पाठविलीं तीं प्रविष्ट झालीं स्वामींनीं पैक्याविस लिहिलें कीं ज्येष्ठ आषाढमास द्यावेसें मान्य केलें, परंतु सांप्रतच पैका पाठवून देणें. त्यास स्वामींची आज्ञा मान्य करून वे० राजश्री प्रभा- कर जोशी यांसमागमें रुपये १००० एक हजार पाठविले आहेत. स्वामींनीं घेऊन पावल्याचे उत्तर पाठवून द्यावयाची आशा केली पा हिजे. स्वामीपासीं आमचें पत्र ज्येष्ठ आषाढ मास हजार रुपये देतों ह्मणून पत्र लेहून पाठविलें होतें, तें पत्र आमचें माघारें जासुदापास दिल्हें पाहिजे. आह्मी स्वामींचे चरणरज सेवक असों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. - [ लेखांक २३८ ] श्री. - श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज महादाजी अंबाजी कृतानेक विज्ञापना ता० छ० २० जि- ल्हेजपर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष कृपा करून पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाइलें, संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते उत्तम समयीं