पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ प्रविष्ट होऊन परम आल्हाद जाहला. प्रसाद कुडती व तिवट पाठ- विलें तें पावलें. पांचरों रुपये द्यावयाचा करार केला आहे त्यास पांचशे रुपये यंदाचे पाठवून देणें ह्मणोन आज्ञा. ऐशीयास स्वामींस आह्मीं हजार रुपये तीन वर्षांनीं देतों, त्याप्रमाणे हे पांचरों तीन वर्षांनीं द्याव- याचा करार आहे. त्याबमोजीच सेवेसी प्रविष्ट होतील. सर्वदा चरणरजावर कृपा असों द्यावी. पत्रीं सांभाळ करावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक २३९ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज महादाजी अंबाजी कृतानेक विज्ञापना. येथील कुशल ता० अधिक बहुल पंचमीपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाइलें. कितेक अर्थ स्वामींनीं विशदें आज्ञापिला. त्यांत मुख्यार्थ हाच कीं तुझी दोन भाव धरितां. असो. कुडतीस पसमी थानें २ व दुलईस पसमी थानें ३ एकूण पांच व संजाब तापता गज ३ पाठवणें ह्मणोन आज्ञा. ऐशास स्वामी ईश्वरस्थानीं आहेत. स्वामींजवळ दोन भाव आह्मी धरूं हें सर्वथा होणें नाहीं. पसमी थानाविशीं व तापतीयाची आज्ञा, त्यास येविशीं श्रीमंतास विनंति केली. पसमी थानें समागमें आणिलीं नाहींत. स्वामींनीं आशा केली त्याजवरून पुण्यास लिहिले आहे. पसमी थानें व तापता येतांच सेवेसी पाठवून देतील. जिनसाचे अधिक पन्नास रुपये द्यावे होते झणोन स्वामींनीं आशा केली, त्यास श्रीमंताची दौलतच स्वामींच्या आशीर्वादाची. जें आहे तें सर्व स्वामींचें आहे. स्वामी पन्नास रुपये अधिक द्यावयाचें कां ह्मणतात ? स्वामींच्या पायावितरिक्त श्रीमं तास अन्य दैवत नाहीं. रामाजी पंचकुडवा तेलंग याजकडील सत्तावीस रुपये पाठवावयाची आशा. त्यास रामाजी पंचकुडवा श्रीमं ताकडे कोणी चाकर नाहीं, अगर कोण कोठील हेंही ठाव ठिकाण नाहीं. जरी तो चाकर असता तरी लक्षप्रकारें त्याजकडील रुपये उग ● -